Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satej Patil News:अल निनोचे कारण सांगता अन् निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणता; सतेज पाटलांचा पलटवार

Satej Patil on Karjat Bhimashankar Project:' प्रकल्पासाठा केली जाणारी जंगतोड आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाच्या विरोधासाठी स्थानिकांनी २५ ऑक्टोबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना याची सर्व माहिती दिली

  • By anuradha sagar
Updated On: Oct 26, 2026 | 03:13 PM
Karjat, Bhimashankar, Torrent Power, Devendra Fadnavis, Satej Patil,

Karjat, Bhimashankar, Torrent Power, Devendra Fadnavis, Satej Patil,

Follow Us
Follow Us:
  • कर्जत-भीमाशंकर प्रकल्पासाठी  ३ लाख झाडे तोडल्याचा स्थानिकांचा आरोप.
  • शेकडो भल्यामोठ्या झाडांची कत्तल झाल्याने महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘फेक नरेटिव्ह’चा आरोप.
Satej Patil on Karjat Bhimashankar Project:‘एका बाजूला तुम्ही अल निनोचा परिणाम असल्याचे सांगता, पाऊस कमी असल्याचे सांगता. दुसरीकडे पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून असे प्रकल्प आणता. दुर्दैवाने महाराष्ट्रात निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प यायला लागलेत.” अशी टिका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात प्रस्तावित जलविद्यातूल ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या चार ते पाच दिवसात भीमाशंकर जंगल परिसरातील शेकडो भल्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

विरोधकांकडून फेक नरेटिव्ह- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, भीमाशंकर चा प्रकल्प आणि कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा संपूर्णपणे पर्यावरणाला पूरक आहेत, तरीही या प्रकल्पांबाबत विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याची टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. खोटा नरेटिव्ह तयार करणे हे महाराष्ट्रविरोधी कृत्य आहे. या प्रकल्पामुळे कोणाच्याही उपजिविकेवर परिणाम होणा नाही. जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर राज्य सरकारकडून त्यांचे योग्य पुर्नवसन केल जाईल, असही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil: 500 कोटी ऑडिओ क्लिपमधील ती महिला कोण? जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले…

पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून असे प्रकल्प- सतेज पाटील

फडणवीस यांच्या याच मुद्द्यावरून सतेज पाटील यांनी निशाणा साधला आहे. “एकीकडे तुम्ही अल निनोचा परिणाम तुम्ही सांगता , पाऊस कमी असल्याचे सांगता. दुसरीकडे पर्यावरणाचे सगळे नियम धाब्यावर बसवून असे प्रकल्प आणता. दुर्दैवाने महाराष्ट्रात निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प यायला लागलेत. आमचा प्रकल्पांना विरोध नाही, पण तुम्ही जिथे निसर्गाची हानी होणार नाही, असे प्रकल्प यायला हवेत. डेटा सेंटरबद्दल जी आकडेवारी पुढे आली आहे, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याच्या वापरावरूनही चर्चा सुरू आहे. म्हणून राज्यात असे उद्योग-व्यवसाय आणि ज्यातून रोजगार उपलब्ध होतील आणि निसर्गाची हानीही होणार नाही,”असा सल्ला सतेज पाटील यांनी दिला आहे.

कर्जत-भीमाशंकर जंगल परिसरात जंगलतोड

खरंतर, गुजरातमधील टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकर जंगल परिसरात जंगलतोड केली जात आहे. या वक्षतोडील स्थानिकांसह राज्यातील विरोधी पक्षांनीही कडाडून विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी जंगलातील अंदाजे तीन लाख झाडे तोडण्यात येणार अससल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून महायुती सरकारवर पक्षपातीपणाचा आरोपही केला जात आहे.

InsurTech And Life Insurance : पॉलिसी काढणं आता झटपट! इन्शुरटेक आणि तंत्रज्ञानामुळे विमा खऱ्या

प्रकल्पासाठी केली जाणारी जंगतोड आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाच्या विरोधासाठी स्थानिकांनी २५ ऑक्टोबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना याची सर्व माहिती दिली त्यानंतर राज ठाकरेंनीदेखील कर्जत-भीमाशंकर परिसराचा दौरा करून प्रकल्पाची पाहणी दौरा करणार असल्याचे सांगत तिथे सभाही घेणार असल्याचे म्हटले आहे.

या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. जमीनमालकांच्या चिंता आणि पर्यावरण संरक्षणाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. यामुळे भीमाशंकर परिसरातील स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

नेमका काय आहे प्रस्तावित प्रकल्प?

दरम्यान, विकासाच्या नावाखाली कर्जत-भीमाशंकर परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे नुकसान केले जात असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. भीमाशंकर येथील साई डोंगर परिसरात गुजरातमधील टोरंट पॉवर कंपनीचा प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १३ हजार ५०० कोटी रुपये खर्च ही केला जाणार आहे. या प्रकल्पाची क्षमता तीन हजार मेगावॅट असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकल्पासाठी तीन लाखांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्यामुळे परिसरातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पक्षी आणि वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याची तसेच डोंगरउतारावरील मृदासंवर्धन, नैसर्गिक जलप्रवाह, पारंपरिक शेती आणि पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यताही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्जत-भीमाशंकर प्रकल्पासाठी कोणत्या कंपनीकडून वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप आहे?

    Ans: गुजरातमधील टोरंट पॉवर (Torrent Power) कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत साठवण प्रकल्पासाठी या जंगल परिसरात वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय भूमिका मांडली?

    Ans: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की हा प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणपूरक असून विरोधक यावर फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. खोटा प्रचार करणे हे महाराष्ट्रविरोधी कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले.

  • Que: काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या प्रकल्पावर काय टीका केली?

    Ans: सरकार एकीकडे 'अल निनो'चे कारण सांगते आणि दुसरीकडे ३ लाख झाडे तोडून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणते. निसर्गाची हानी न करता स्थानिकांना रोजगार देणारे उद्योग आणावेत, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: Satej patil criticized karjat bhimashankar tree felling controversy as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Congress
  • devendra fadnavis
  • environment
  • Maharashtra Politics
  • Satej Patil

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

Rahul Gandhi convoy Accident:  पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर, दोघे जखमी 
2

Rahul Gandhi convoy Accident: पूर्वांचल द्रुतगती मार्गावर राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर, दोघे जखमी 

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा
3

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राहुल गांधी निर्दोष, सुलतानपूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राहुल गांधी निर्दोष, सुलतानपूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.