Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gunratna Sadawarte : ‘उपवर्गीकरण होऊ देणार नाही’; नाशिकमध्ये सदावर्तेंची आक्रमक भूमिका, ‘४८ तासांत निर्णय रद्द करेन’

Gunratna Sadawarte : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. नाशिकमधील आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांनी उपवर्गीकरणाला विरोध करत आक्रमक भाषण केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत त्यांनी ४८ तासांत निर्णय रद्द करण्याचा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Oct 03, 2026 | 07:28 PM
gunratna sadavarte

gunratna sadavarte

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या आंदोलनात गुणरत्न सदावर्तेंचा उपवर्गीकरणाला विरोध.
  • ‘४८ तासांत निर्णय रद्द करून दाखवेन’ असा सदावर्तेंचा दावा.
  • मातंग समाज आणि अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाबाबतही त्यांनी भाष्य केलं.
 

नाशिक : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विविध ठिकाणी मोर्चे आणि आंदोलनं सुरू असतानाच नाशिकमधील उपवर्गीकरणाविरोधातील आंदोलनात प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) सहभागी झाले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून उपवर्गीकरणाला तीव्र विरोध केला.

‘मी डंके की चोट पे बोलत असतो. वर्गीकरणाचं राजकारण सुरू आहे; पण मी वर्गीकरण होऊ देणार नाही. मी आंबेडकरी वकील आहे. मी जे बोलतो ते करतो,’ असं सदावर्ते म्हणाले.

‘४८ तासांत निर्णय रद्द करून दाखवेन’

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत सदावर्तेंनी उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, वर्गीकरणासाठी संबंधित मागासवर्गीय अहवाल आणि आवश्यक प्रक्रिया महत्त्वाची आहे.

CJP आंदोलनात लहान मुलांचा ‘मानवी ढाल’ म्हणून वापर? NHRC कडून मुंबई पोलीस, MeitY अन् X Corp ला नोटीस

‘आज तुम्ही वर्गीकरण केलं तर उद्या दुपारी तीन वाजता रद्द करेन,’ असा दावाही सदावर्तेंनी केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला घटनात्मकदृष्ट्या परवानगी देताना राज्यांना पुराव्यावर आधारित प्रक्रिया करण्याची मुभा दिली होती. मातंग समाजाबाबतही सदावर्तेंनी भाष्य केलं. ‘ट्रिपल टेस्ट झाली तर मातंग समाज अनुसूचित जातीतून बाहेर जाईल,’ असा दावा त्यांनी केला.

उपवर्गीकरणाचा मुद्दा हा केवळ दोन समाजांमधील संघर्ष नसून अनुसूचित जातींच्या अंतर्गत आरक्षणाच्या लाभांच्या वाटपाशी संबंधित असल्याचं विविध चर्चांमध्ये समोर आलं आहे. दरम्यान, मातंग समाजाकडून अनुसूचित जातींच्या आरक्षणात स्वतंत्र उपवर्ग निर्माण करण्याची मागणी जोर धरत आहे.

‘एकनाथ शिंदेंसारखे पाच आले तरी वर्गीकरण होणार नाही’

आपल्या भाषणात सदावर्तेंनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. ‘एकनाथ शिंदेंसारखे पाच आले तरी वर्गीकरण होणार नाही,’ असं ते म्हणाले. तसंच सरकारने राजकारण न करता मातंग समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मातंग समाजाला आर्थिक आणि औद्योगिक संधी मिळाव्यात, यासाठी MIDC मध्ये समाजातील लोकांना भूखंड देण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणावरून राज्यात सध्या दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. मातंग समाजातील संघटना उपवर्गीकरणाची मागणी करत आहेत, तर त्याला विरोध करणाऱ्या संघटनांकडून अनुसूचित जातींच्या एकतेचा मुद्दा मांडला जात आहे. त्यामुळे पुढील काळात हा मुद्दा आणखी चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Web Title: Gunratna sadawarte sc sub classification nashik protest reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Gunratna Sadawarte
  • reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.