Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपाची ‘वन नेशन, वन पार्टी’कडे वाटलाच, विधान परिषद निकाल म्हणजे ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’चा प्रकार – हर्षवर्धन सपकाळ

विधान परिषद निवडणुकीत महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सत्तेचा गैरवापर, साम-दाम-दंड-भेद नीती आणि लोकशाहीऐवजी ठोकशाहीचे राजकारण सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 08:50 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:

विधान परिषद निवडणुकांच्या निकालाने राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले असून 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत सुमार राहिली असून फक्त एका जागेवर यश मिळवता आले आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीका करत या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर केला असल्याचे म्हंटले आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचा सत्तेचा उन्माद दिसून आला. जिसके हाथ में लाठी, उसकी भैंस, प्रमाणे या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर केला. लोकशाही नाही तर ठोकशाही पद्धतीचे चित्र या निवडणुकीत दिसले. बळी तो कान पिळी प्रमाणे भाजपाची भूमिका असून आता विरोधी पक्ष व नंतर मित्रपक्ष संपवून वन नेशन, वन पार्टीकडे वाटलाच सुरु झालेली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

‘ट्रिपल संजय आमच्याकडे आहेत, चौथा संजय…,’ 6 खासदारांच्या प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांचा संजय राऊतांना टोला

निवडणूक निकालावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “निवडणुका या लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडल्या पाहिजेत. पण मागील काही वर्षापासून निकोप निवडणुकीचे चित्र दिसत नाही. सत्ताधारी भाजपा महायुती सत्तेच्या गैरवापर करून निवडणुका जिंकत आहे, त्यांच्या मदतीला प्रशासन व निवडणूक आयोग आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे उमेदवार पळवणे, त्यांचे अर्जच बाद करणे किंवा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणणे, असे प्रकार सर्रास होत आहेत, ते विधान परिषदेच्या निवडणुकीतही दिसले.”

“भाजपा स्वतःला शक्तीशाली पक्ष म्हणवतो पण त्यांच्याकडेही उमेदवारही नाहात म्हणून दुसऱ्या पक्षातून फोडाफोडी करावी लागते. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान रक्षणासाठी निवडणुका लढतो पण सत्तेच्या व पैशाच्या जोरावर निवडणुकीत धुडगुसु घातला आहे. प्रत्येक मतदाराला ५-५ लाख रुपये व इतर आमिषे दाखवण्यात आली. सत्ताधारी पक्षाचा विजय हा सत्तेचा व पैशाचा माज आहे,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

‘ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार, २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार,’ एकनाथ शिंदेंची ग्वाही

काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ नसले तरी लोकशाही व संविधान रक्षणासाठी आमची ही लढाई सुरु आहे. नागपूर मध्येही संख्याबळ नव्हते तरिही एका वैचारिक लढाईच्या भूमिकेतून अतुल लोंढे यांनी निवडणूक लढविली. विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची समिक्षा वरिष्ठ नेत्यांची एक समिती लवकरच करेल, असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal slams bjp over mlc election results one nation one party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • vidhanparishad election 2024

संबंधित बातम्या

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
1

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
2

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
3

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
4

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.