Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SHe-Box Portal: रस्त्यावरची शेरेबाजी असो वा लैंगिक छळ; आता ‘SHe-Box’ वर एका क्लिकवर नोंदवा तक्रार; पाहा कशी आहे प्रक्रिया

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पोर्टल महत्त्वाचे साधन ठरत आहे. पूर्वी 'शी बॉक्स' पोर्टल केवळ कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापुरते मर्यादित होते; मात्र, आता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 22, 2026 | 12:05 PM
Women Safety, SHe Box, Central Government, POSH Act, Online Complaint,

Women Safety, SHe Box, Central Government, POSH Act, Online Complaint,

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करून त्याची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • केंद्र सरकारने ‘शी बॉक्स’ पोर्टलची व्याप्ती वाढवली असून आता महिलांना कामाच्या ठिकाणासोबतच सार्वजनिक ठिकाणच्या छेडछाडीचीही ऑनलाइन तक्रार नोंदवता येणार आहे.
  • या पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी ९० दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असून तक्रारदार महिलेची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे
 

What is SHe Box Portal: कामाच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळ, छेडछाड आणि गैरवर्तनाच्या घटनांविरोधात त्वरित कारवाई व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेले ‘शी बॉक्स’ पोर्टल अधिक सक्षम करण्यात आले असून, महिलांना थेट ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पोर्टल महत्त्वाचे साधन ठरत आहे. पूर्वी ‘शी बॉक्स’ पोर्टल केवळ कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापुरते मर्यादित होते; मात्र, आता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, रस्त्यावरची शेरेबाजी, तसेच इतर कोणतेही गैरवर्तन याबाबतही तक्रार नोंदविता येणार आहे. राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, कार्यालये व इतर संस्थांमध्ये या समित्या स्थापन करून त्यांची माहिती शी बॉक्स पोर्टलवर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असलेल्या अनुदानित, अंशतः अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांचा समावेश आहे.

BJP Protest : “भाड्याची माणसं आणून रस्ते जाम…हा जगातील निर्लज्जपणा: MP संजय राऊतांचे टीकास्त्र

 

माहिती अद्ययावत करणे बंधनकारक

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी लागू असलेल्या पोश कायदा, २०१३ अंतर्गत राज्यातील सर्व शाळा व संबंधित आस्थापनांनी शी बॉक्स पोर्टलवर नोंदणी करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक करण्याचे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.

तक्रार केल्यानंतर लगेच होणार निवारण

तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित विभाग आणि पोलिस यंत्रणेला त्वरित माहिती पाठविली जाते. त्यानुसार जवळच्या पोलिस ठाण्याकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाते. तसेच तक्रार अंतर्गत समिती किंवा स्थानिक समितीकडे पाठविण्यात येते. नियमांनुसार अशा तक्रारींची चौकशी ९० दिवसांच्या आत पूर्ण करणे अपेक्षित आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

शाळांची यादी करुन नोंदणी करण्याच्या सूचना

शिक्षणाधिकारी यांनी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून संबंधित शाळांची यादी तयार करून सर्व मुख्याध्यापकांना तातडीने पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शी बॉक्स पोर्टलवर या संदर्भातील शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना व जनजागृतीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

पुण्यातील गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात अपघात; PMP बसचे ब्रेक अचानक फेल, बस थेट दुकानातच

काय आहे शी-बॉक्स पोर्टल ?

शी-बॉक्स हे भारत सरकारचे एक ऑनलाइन पोर्टल आहे, जे कार्यरत महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी एक सुरक्षित आणि केंद्रीकृत व्यासपीठ आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवले जाणारे हे पोर्टल (https://shebox.wcd.gov.in/) खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांतील महिलांना ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची आणि त्यांच्या स्थितीचा मागोवा घेण्याची सुविधा देते.

शी-बॉक्स पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये:

उद्दिष्ट: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये त्वरित आणि पारदर्शक कारवाई सुनिश्चित करणे (पॉश कायदा २०१३).

यांच्यासाठी: शासकीय, खाजगी, संघटित किंवा असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांसाठी.

वैशिष्ट्य: हे एक गोपनीय आणि सुरक्षित व्यासपीठ आहे, जिथे तक्रारी थेट संबंधित अंतर्गत समिती (ICC) किंवा स्थानिक समिती (LC) कडे पाठवल्या जातात.

तक्रार देखरेख: तक्रारदार आपल्या तक्रारीची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात.

अनिवार्य: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्व संस्थांनी (शासकीय आणि खाजगी) या पोर्टलवर आपल्या संस्थेचा तपशील आणि आयसीसीचा तपशील नोंदवणे अनिवार्य आहे.

 

अशी करा तक्रार

– वेबसाइटला भेट द्या- https://she-
box.wed. gov.in., https://she-
box.wcd.gov.in.
-Register Your Complaint वर क्लिक करा मोबाइल नंबर टाका आणि आलेल्या ओटीपीने लॉगिन करा

 

Web Title: How to register a complaint on she box a step by step guide to the enhanced womens safety portal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 12:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.