
पुण्यात भाजप 38, शिवसेना २
पुणे : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह इतर 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. राज्यातील अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. सध्या मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरु आहे. पुण्यात भाजप 38 जागांवर आघाडीवर आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना दोन जागांवर आघाडीवर असल्याची माहिती दिली जात आहे.
राज्यातील महानगरपालिकांसाठी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर अनेक भागांतील निकाल हळूहळू समोर येत आहे. यात कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शाहू विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. वसई-विरारमध्ये भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. तर बहुजन विकास आघाडी 85 जागांवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. तर पुणे महापालिकेत भाजप 38, शिवसेना २, राष्ट्रवादी १४, शरद पवारांच्या राष्ट्रवादी केवळ एकाच जागेवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना एकाही जागेवर अद्याप आघाडीवर नाही.
दरम्यान, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Municipal Election Result 2026) रणधुमाळी सुरु आहे. तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या निवडणुकीचा (PMC Election 2026) निकाल हाती येत आहे. काल 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर आता निकाल हाती येत आहे. यावेळी 29 महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पालिकेची (PCMC Election 2026) राहिली आहे.
हेदेखील वाचा : PCMC Election 2026 : पिंपरी चिंचवडचा “दादा’ कोण होणार? मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप आघाडीवर