Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

SIR Process Protest:  मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोग आणि शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. SIR प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 09, 2026 | 01:45 PM
SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Follow Us
Follow Us:
  • SIR प्रक्रियेविरोधात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
  • निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
  • जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुंबई/अमरावती : विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेतील अनियमितता, मतदारांची नावे वगळण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गर्ल्स हायस्कूल चौकातून दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी निवडणूक आयोग व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ॲड.यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे आदींनी केले.

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. यावेळी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे वगळण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, पात्र मतदारांची नावे तातडीने पुनर्नोंदणीत आणावीत, मतदारांना आक्षेप नोंदविण्याची पुरेशी संधी द्यावी तसेच मतदार यादीतील बदलांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

SIR आणि ‘वोट चोरी’ करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी इंडिया आघाडीने अमरावतीत भव्य मोर्चा काढला. यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, अमरावती यांची भेट घेतली. ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण देशात गोंधळ निर्माण केला असून त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. तसेच देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सरकारकडून दिली जाणारी वागणूकही निषेधार्ह आहे. #votechori #ECI #indiaalliance #Congress #protest — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) October 9, 2026


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता व घटनात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्याबरोबरच नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठविल्याचा उल्लेख करत, आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचीही इंडिया आघाडीने निषेध केला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणीही करण्यात आली. ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’

SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदारांच्या हक्कांचा प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, मतदारांचा अधिकार वाचवा’, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

मी राज्याची मंत्री, आमदार राहिलेली असताना माझ्या मुलांच्या मतदान ओळखपत्रात त्रुटी काढण्यात आली. मग सर्वसामान्यांचं काय? त्यामुळे मूळ मुद्दा हा SIR आणि वोट चोरीचा आहे. भाजपने ऍप तयार करून त्याचा एक्सेस तहसीलदार आणि इतरांना देण्यात आलाय. कोणती नावं डिलिट करावीत हे ठरवलं जात आहे. ज्ञानेश कुमार यांनी पूर्ण देशात गोंधळ घातलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय. तीही निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

Web Title: India alliance protest march against sir process election commission district collector office sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • SIR

संबंधित बातम्या

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
1

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
2

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं
3

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.