Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navnath Waghmare News: नवनाथ वाघमारे यांच्यावर जालन्यात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप

नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींविषयी लज्जास्पद आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केला. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 17, 2026 | 04:18 PM
Navnath Waghmare News: नवनाथ वाघमारे यांच्यावर जालन्यात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप
Follow Us
Follow Us:
  • जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात नवनाथ वाघमारे यांच्यावर तक्रार नोंदवून गुन्हा दाखल
  • मराठा समाजातील मुलींविषयी अपमानास्पद व लज्जास्पद शब्द वापरल्याचा आरोप
  • वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवून अटकेची मागणी
 

Navnath Waghmare News:  मराठा समाजातील मुलींविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींविषयी लज्जास्पद आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केला. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Navnath Waghmare News: ओबीसींची मुले अन् पैसा पाहून मराठा तरुणी त्यांच्या घरात घुसतात; नवनाथ वाघमारेंचे वादग्रस्त विधान

“मराठा समाजातील मुलींसाठी लज्जास्पद वाटेल असे शब्द त्यांनी उच्चारले आहेत. तसेच दोन समाजांमध्ये तेढ वाढेल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी,” अशी मागणी तक्रारदार महिलेने केली.

मराठा आंदोलकांचा संताप

या प्रकरणावर मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. नवनाथ वाघमारे यांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका काळकुटे यांनी मांडली. नवनाथ वाघमारे यांच्या कथित वक्तव्यावरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. या प्रकरणातील नेमके वक्तव्य, त्याची पार्श्वभूमी आणि पोलिसांच्या तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

Pune MH 12 RTO Number Series Change: पुण्याची ‘MH-12’ ही ओळख बदलणार?; ‘ZZ’ मालिका संपल्याने RTO चा नवा प्लॅन

काय म्हटले होते नवनाथ वाघमारे ?

ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या तरूणींबद्दल धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाची ठिगणी पडण्याची शक्यता आहे. ” ओबीसी नेत्यांची गोंडस मुले पाहून मराठा समाजाच्या तरूणी घरात घुसतात. त्यांची मुले आणि पैसा बघतात,” असं धक्कादायक विधान वाघमारे यांनी केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: सांगितलय की, माझी सून मराठा आहे. माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांच्या मंत्र्यांची सुंदर मुले दिसली की, या मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात. मग जर हे मंत्री मराठ्यांच्या मुलीचे ऐकून ओबीसींचं वाटोळे करणार असतील तर त्यांनी आम्हाला ओबीसींची गरज नाही असं समोर येऊन सांगावे.” असंही वाघमारे यांनी म्हटलं आहे.

वाघमारे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या असून वाघमारेंच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशाराही अनेकांनी दिला आहे. शिवसेना नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या की,” हा फक्त मराठा नाही तर सर्व महिला वर्गाच्या सन्मानाचा विषय आहे. कोणत्याही समाजातील स्रीयांचा अपमान करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. मराठा समाजातीलच मुलीच ओबीसी मुलांसोबत लग्न करतात असे नाही तर कित्येक ओबीसी समाजातील मुलीदेखील मराठी मुलांसोबत लग्न करतात.”

 

Web Title: Jalna newscase filed against obc leader navnath waghmare in jalna for objectionable statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • jalna news
  • Maratha community
  • obc

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर
1

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.