Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून जावळी पंचायत समितीत खडाजंगी; शिल्पा शिंदेंसह सदस्य आक्रमक

जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. सदस्य शिल्पा शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत बदलीचा ठराव मंजूर करण्याची जोरदार मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 09, 2026 | 01:10 PM
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून जावळी पंचायत समितीत खडाजंगी; शिल्पा शिंदेंसह सदस्य आक्रमक

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून जावळी पंचायत समितीत खडाजंगी; शिल्पा शिंदेंसह सदस्य आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून शिल्पा शिंदेंसह सदस्य आक्रमक
  • जावळी पंचायत समिती मासिक मिटिंग वादळी
  • बदलीचा ठराव घ्याचं सदस्य ठरावावर ठाम
मेढा : जावली पंचायत समितीची मासिक बैठक सभापती सौरभ शिंदे यांच्या अनुपस्थितीत वादळी ठरली. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला तर धुमाळ यांच्या बदलीवर सदस्या शिल्पा शिंदेंसह विरोधी सदस्य चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या बदलीचा ठरावावर ठाम राहिले.त्यामुळे ही सभा वादळी ठरली.तर अधिकारी आणि कर्मचारी हे सांगून सूचना देऊन ऐकत नसतील तर मी कोणाला सोडणार नाही गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम उपसभापती गोरख महाडिक यांनी बैठकीचे अध्यक्ष स्थानावरून दिला. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठरावावरून उपसभापती महाडिक आणि सदस्यांमध्ये किरकोळ तू तू मै मै झाली.

जावली पंचायत समितीची मासिक सभा उपसभापती गोरख महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला सदस्य शिल्पा शिंदे,चारुशीला पवार,सुनिता दुंदळे,अतिष कदम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने,गटविकास अधिकारी संतोष पवार उपस्थित होते.

राज्यात नगरपरिषद-नगरपंचायतींची रणधुमाळी; 14 जिल्ह्यांत 47 जागांवर पोटनिवडणूक जाहीर

“गाठ माझ्याशी आहे”

यावेळी महावितरणच्या चर्चेत मार्ली येथील एक दहावीतील मुलगा विजेचा शॉक लागून मरण पावला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की पंचनामा करा गुन्हा दाखल करा परंतु त्यांनी ऐकलं नाही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. यावर उपसभापती गोरख महाडिक हे संतप्त झाले अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं असताना अधिकारी आणि कर्मचारी यांनी सांगून,सूचना देऊन सुद्धा ऐकलं नाही तर मी कोणालाच सोडणार नाही गाठ माझ्याशी आहे. हे ध्यानात ठेवा असा सज्जड दम उपसभापती गोरख महाडिक यांनी भर सभागृहात दिला.  यावर महावितरणचे अभियंता सुरेश कुंभार यांनी माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.

शिक्षण विभागाच्या चर्चेत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या विषयावर विशेष बैठक झाली असून दोन्ही शिक्षक संघटना व अनेक शिक्षकांनी त्यांच्या विरोधात त्यांच्या समक्ष तक्रारी केल्या असून त्यांच्यामुळे तालुक्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप कदम यांनी केला यावर उपसभापती गोरख महाडिक हे या प्रकरणावर वारंवार पडदा टाकण्याचा प्रयत्न करत होते सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते परंतु आतिश कदम व शिल्पा शिंदे यांनी आपला हट्ट सोडला नाही.

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज त्यांच्या मोबाईलवर घेतले असून ते उपस्थित नसताना कार्यालयात कोण आले कशासाठी आले याची माहिती त्यांना घरी बसून कळते यावर सदस्य शिल्पा शिंदे यांनी आक्षेप घेतला होता, व मोबाईलवर कार्यालयाचे फुटेज घेण्यास मज्जाव करण्यात आला होता त्याचं काय झालं असाही सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

जावली तालुक्यात आरोग्य विभाग ग्रामीण रुग्णालय पशुधन विभाग शिक्षण विभाग आदी विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असून याबाबत संबंधित विभागांना रिक्त पदे मागणीबाबत प्रस्ताव देण्याची सूचना उपसभापती गोरख महाडिक यांनी केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असून कार्यरत अधिकाऱ्यांना चोवीस – चोवीस तास काम करावे लागत असल्याने मानसिक ताण पडत असल्याचे सांगितले .

पंचायत समितीच्या नव्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह  असं नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येऊन जिल्हा परिषदेच्या बैठकीत पाठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील सभेचे अध्यक्ष गोरख महाडिक यांच्या उपस्थितीत यावेळी घेण्यात आला.

सिनेमाचा पडदा ते सत्तेचं शिखर! थलपती विजय यांचा उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी; ‘राज्याभिषेका’साठी तामिळनाडू सज्ज

Web Title: Jawali panchayat samiti meeting group education officer transfer controversy marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
1

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.