Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Waghmare : डोक्यावर पदर, आडवं कुंकू अन् हातात संविधान; राज्यसभेतील शपथविधीला ज्योती वाघमारेंची सावित्रीमाईंना खास आदरांजली

Jyoti Waghmare Oath-taking ceremony : राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये ज्योती वाघमारे यांनी सावित्रीबाई फुलेंसारखा पेहराव करत हातात संविधान घेत शपथ घेतली. याची चर्चा सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2026 | 02:35 PM
Jyoti Waghmare Savitribai Phule Look while Rajya Sabha MP Oath Taking Ceremony live 2026

Jyoti Waghmare Savitribai Phule Look while Rajya Sabha MP Oath Taking Ceremony live 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी
  • ज्योती वाघमारे यांनी घेतली खासदारकीची शपथ
  • ज्योती वाघमारे यांचा खास सावित्रीबाई फुलेंसारखा लूक
Jyoti Waghmare Savitribai Phule Look : नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील खासदारकीची शपथ घेतली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आणि ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांचा शपथविधी पार पडला. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत ज्याोती वाघमारे राहिल्या आहेत. त्यांनी सावित्रीमाई फुलेंना अनोखी मानवंदना वाहिली आहे. सावित्रीबाईंसारखा पेहराव करत ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेमध्ये शपथ घेतली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. ज्योती वाघमारे या पुरोगामी विचारांच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात, त्यांचा राज्यसभेमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली. सावित्रीबाई फुले यांच्या पोषाखामध्ये ज्योती वाघमारे यांनी शपथ घेतली .

हे देखील वाचा : “तुम्हाला हवे आहे म्हणून लगेच पाठिंबा द्यायचा का? बारामतीचा विषय संजय राऊतांनी एकाच वाक्यात संपवला

ज्योती वाघमारे यांनी निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्याचबरोबर सावित्रीमाईंप्रमाणे आडवं कुंकू आणि नथ घातली होती. तसेच हातामध्ये संविधान घेऊन ज्योती वाघमारे राज्यसभेमध्ये दाखल झाल्या. डोक्यावर पदर घेतलेल्या ज्योती वाघमारे या सावित्रीबाई फुलेंप्रमाणे राज्यसभेमध्ये दाखल झाल्या. यामुळे शपथ घेताना ज्योती वाघमारे यांच्याकडे सर्व संसदेचे लक्ष वेधले गेले.

राज्यसभेमध्ये ज्योती वाघमारे यांनी मराठीमध्ये शपथ घेतली. मी डॉ. ज्योती सावित्री नागनाथ वाघमारे राज्यसभेची शपथ घेते की… असे म्हणत त्यांनी शपथ घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला, मात्र शपथ घेताना कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख न करण्याचा नियम असल्याने सभापती व उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना थांबवले. आणि ज्योती वाघमारे यांना पुन्हा एकदा शपथ घेण्यास सांगितले. कोणत्याही व्यक्तीच्या नावाशिवाय फक्त संविधानाची साक्ष घेत ज्योती वाघमारे यांनी खासदारकीची शपथ घेतली.

हे देखील वाचा :  आता गर्भवती महिलांच्या पतींचीही होणार ‘HIV’ आणि ‘सिफलिस’ चाचणी; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवी पॉलिसी

 

शपथ घेतल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. याची आठवण करुन देत ज्योती वाघमारे यांनी सभापतींना नमस्कार केला. “तुम्ही महाराष्ट्रातून आहात. मला आशीर्वाद द्या,” असा संवाद ज्योती वाघमारे यांनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याशी केला आहे.

Web Title: Jyoti waghmare savitribai phule look while rajya sabha mp oath taking ceremony live 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Jyoti Waghmare

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.