कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत पंचायतीत निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. कर्जत पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणमुळे गेली दोन ते अडीच वर्षे पुढे ढकलली गेलेली आरक्षण सोडतीमुळे तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
कर्जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज कर्जत प्रशासकीय भवन येथे काढण्यात आली. प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीबद्दल सर्व माहिती कर्जत तालुक्याचे तहसीलदार डॉ धनजंय जाधव यांनी दिली.कर्जत तालुक्यात पंचायत समितीच्या 12 जागा असून त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. लोकसंख्येनुसार अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव गण आणि सर्व साधारण गण यांची घोषणा या सोडतींत करण्यात आली.2011 चे जनगणनेनुसार अनुसूचित जमाती लोकसंख्या लक्षात घेऊन कर्जत पंचायत समिती मध्ये तीन गण हे अनुसूचित जमाती आरक्षित ठेवण्यात आले.तर एकूण लोकसंख्येच्या 27टक्के जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.तर सर्वसाधारण साठी सहा जागा आरक्षित करण्यात आल्या.महिलांचे 50 टक्के आरक्षण सोडत काढण्यात आली.
कर्जत पंचायत समिती मधील दहा गणपैकी कळंब, पाथरज, कशेळे तीन गण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असून त्यातील कळंब आणि पाथरज हे महिला राखीव झाले आहे.तर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी पोशीर,मोठे वेणगाव, उकरूळ ही तीन गण आरक्षित झाले असून त्यातील पोशीर आणि उकरूळ हे दोन गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव म्हणून आरक्षित झाले आहेत. तालुक्यातील एकूण 12 गण पैकी माणगाव तर्फे वरेडी,नेरळ,दामत, वाकस,कडाव आणि बीड बुद्रुक हे सहा जण सर्वसाधारण झाले आहेत.त्यातील दोन गण महिला राखीव ठेवण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या असून सहा पैकी कडाव आणि बीड बुद्रुक चार गण सर्वसाधारण महिला राखीव झाले आहेत.
या आरक्षण सोडतसाठी राजेश भगत,केतन बेलोसे,अशोक कांबेरे,गणेश ठाकरे,समीर देशमुख,कुमार बोराडे,संजय तांबोळी,वसंत जाधव,
आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.आरक्षण सोडती साठी प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांना तहसीलदार डॉ धनजंय जाधव आणि निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी सहकार्य केले.
कर्जत पंचायत समिती आरक्षण 2025
1 पोशीर ..
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
2 कळंब ..
अनुसूचित जमाती महिला राखीव
3पाथरज ..
अनुसूचित जमाती महिला राखीव
4कशेळे ..
अनुसूचित जमाती
5माणगाव तर्फे वरेडी ..
सर्वसाधारण
6 उकरूळ ..
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
7 नेरळ ..
सर्वसाधारण
8दामत ..
सर्वसाधारण
9 वाकस ..
सर्वसाधारण
10कडाव ..
सर्वसाधारण महिला राखीव
11 मोठे वेणगाव ..
नागरिकांचा मागास प्रवर्ग
12 बीड बुद्रुक. .
सर्वसाधारण महिला अशी आरक्षण सोडत असून लवकरच ग्रामपंचायतीचं बिगुल वाजणार आहे.