Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल…; कीर्तनकारांनी थेट कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना दिली धमकी

Balasaheb Thorat Death threat : संगमनेरमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नथूराम गोडसे हे नाव घेत धमकी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 19, 2025 | 04:46 PM
Kirtankar Sangram Bhandare threatens to kill Balasaheb Thorat by using Nathuram Godse name

Kirtankar Sangram Bhandare threatens to kill Balasaheb Thorat by using Nathuram Godse name

Follow Us
Close
Follow Us:

Balasaheb Thorat Death threat : संगमनेर : वारकरी सांप्रदायातील हरीनाम सप्ताहामध्ये कीर्तनकारांनी राजकीय भाष्य केल्यामुळे संगमनेरमध्ये वाद निर्माण झाला आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी कीर्तन देताना कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. या कार्यक्रमानंतर भंडारे यांनी व्हिडिओ व्हायरल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” असा थेट इशारा त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. कॉंग्रेस सह राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संगमनेरचे राजकारण तापले आहे. कीर्तनकारांनी बाळासाहेब थोरात यांना इशारा दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी कीर्तनामध्ये कोणत्या विषयावर बोलायचे हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे. याचे स्वातंत्र्य आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. यापुढे संगमनेरमध्ये कीर्तनकारांवर हल्ला झाला तर यामध्ये सहआरोपी म्हणून बाळासाहेब थोरात यांचे नाव घेतले पाहिजे, असे देखील कीर्तनकार संग्राम भंडारे म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यावर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत मत मांडले आहे. ते म्हणाले की, “संगमनेरमधील हरिनाम सप्ताहामध्ये जे काही घडलं ते सर्व संगमनेरकरांनी समजून घेतले पाहिजे. हरिनामा सप्ताह हा वारकरी सांप्रदायाचे विचार मांडण्याचे ते एक व्यासपीठ आहे. त्याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. त्याची काही पथ्ये देखील आहेत. पथ्ये हेच आहे की, अशा व्यक्तींनी राजकीय भाष्य करू नये. कारण तिथे बंधूभाव असणे गरजेचे असते. कारण कोणाला ठेस लागेल असे वाक्य कोणी करता कामा नये. मात्र दुर्दैवाने हे पाळले जात नाही. राज्यघटनेत कुठेही कोणाला ठेच लागेल अशी वक्तव्ये नाहीत,” अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

मी महात्मा गांधी नाही, पण…

पुढे बाळासाहेब थोरात म्हणाले की, “घुलेवाडीत त्या दिवशी नकारात्मक कीर्तन सुरू असल्याने त्याला विरोध करण्यात आला. त्यानंतर खोट्या केसेस करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. काही कीर्तनकार अशा प्रकारची उचकावणारी वक्तव्ये करतात. पोलिस दबावाखाली काम करत असल्याचेही दिसते. मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्या सारखे बलिदान देण्याची वेळ आली, तर लोकशाहीसाठी ते बलिदान मिळण्यात मला आनंदच आहे.” असे देखील मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या प्रकरणावर जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी लिहिले आहे की, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’  या धमकीचा नेमका अर्थ काय होतो? महाराष्ट्रातील सुसंस्कृत व संयमी नेते अशी ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांना अशा प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण आहे. या संप्रदायाने जगाच्या कल्याणाची शिकवण मानवजातीला दिलेली आहे. मात्र, आज या संप्रदायामध्ये काही समाजविघातक वृत्ती घुसखोरी करून त्याचा राजकीय कारणांसाठी वापर करीत आहेत. याबाबत वारकरी संप्रदायाने सजग राहायला हवे, पण त्यासोबतच अशा प्रकारे धमकी देणाऱ्या समाजकंटकांवर सरकारने कडक कायदेशीर कारवाई करायला हवी,” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Kirtankar sangram bhandare threatens to kill balasaheb thorat by using nathuram godse name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Sangamner

संबंधित बातम्या

Sangamner News : सफाई कामगारांच्या सुरक्षितेत हलगर्जीपणा; भूमिगत नाल्यात गुदमरून २ जणांचा मृत्यू
1

Sangamner News : सफाई कामगारांच्या सुरक्षितेत हलगर्जीपणा; भूमिगत नाल्यात गुदमरून २ जणांचा मृत्यू

Amol Khatal : अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार, विखेंचा पुढाकार
2

Amol Khatal : अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार, विखेंचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.