Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘या’ गावातील ‘अंडे का फंडा’ चांगलाच चर्चेत! रोज होतेय तब्बल 45 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल

एकेकाळी दुष्काळी पट्ट्यात मोडले जाणाऱ्या देवकौठे गावात आज आर्थिक क्रांती होताना दिसत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 01, 2026 | 05:58 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • सगनमेर तालुक्यातील देवकौठे गावात आर्थिक क्रांती
  • पोल्ट्रीफार्मच्या व्यवसायातून दररोज साडे सहा लाख अंड्यांचे उत्पादन
  • 45 लाख रुपयांच्या अंड्यांची होतेय विक्री
आनंद गायकवाड/ संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेले देवकौठे हे गाव संगमनेर, कोपरगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर वसलेले आहे. पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून येथील प्रयोगशील शेतकरी युवकांनी सुरू केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे या गावाने अल्पावधीतच आर्थिक प्रगती साधली असून, संपूर्ण जिल्ह्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज देवकौठे गावात १५० पेक्षा अधिक पोल्ट्री फार्म कार्यरत असून, येथून दररोज सुमारे साडे सहा लाख अंड्यांची विक्रमी निर्यात केली जाते. यामधून गावाची दैनंदिन उलाढाल सुमारे ६५ ते ७० लाख रुपये इतकी होत असून, या व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. परिणामी, शेतीला पूरक म्हणून सुरू झालेला पोल्ट्री व्यवसाय आज गावातील अनेक कुटुंबांसाठी मुख्य उत्पन्नाचे साधन ठरला आहे.

निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना! ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी

आयुष्यमान सरासरी ७०० दिवस

गेल्या २५ वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात कार्यरत असलेले जगदंबा उद्योग समूहाचे संचालक राजेंद्र कहांडळ यांनी सांगितले की, एक दिवसांचे पिल्लू सुमारे १०५ दिवसांत पूर्ण विकसित होते आणि त्यानंतर अंडी उत्पादनास सुरुवात होते. एका कोंबडीचे सरासरी आयुष्यमान ७०० दिवसांचे असते. सुरुवातीला पाच हजार पक्ष्यांपासून सुरू केलेल्या पोल्ट्री फार्मचा विस्तार आज ४० हजार पक्ष्यांपर्यंत झाला असून, त्यात प्रामुख्याने लिअर जातीच्या कोंबड्यांचा समावेश आहे. या व्यवसायामुळे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

दुष्काळी भागात घडलेली आर्थिक क्रांती

संगमनेर तालुक्याच्या उत्तर भागातील तळेगाव पट्ट्यातील देवकौठे गावाला पूर्वी सातत्याने दुष्काळी परिसर म्हणून ओळखले जात होते. मात्र, सुमारे १५ वर्षांपूर्वी युवकांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फार्म सुरू केल्याने या गावाचे चित्रच बदलले. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विविध विकासकामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलण्यास हातभार लागला.

गावाच्या परिसरातील स्वच्छ वातावरण आणि कोरडे हवामान कोंबड्यांच्या संगोपनासाठी पोषक ठरल्याने, आज गावातील २५० पैकी १५० हून अधिक कुटुंबे कमी-अधिक प्रमाणात पोल्ट्री व्यवसायात कार्यरत आहेत.

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

लाखो अंडी, देशभरात निर्यात

देवकौठे गावातील पोल्ट्री फार्ममध्ये १ हजार ते १ लाख पक्ष्यांची क्षमता आहे. येथून दररोज सुमारे साडे सहा लाख अंडी गुजरातमधील सूरत, तसेच मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यात निर्यात केली जातात. अंड्यांच्या साठवणुकीसाठी गावात ५ लाख अंड्यांची क्षमता असलेले एक शीतगृह तसेच २ ते ७ हजार अंड्यांची क्षमता असलेली १५ वेअरहाऊस उपलब्ध आहेत.

स्थानिक मजूर उपलब्ध नसल्याने मध्यप्रदेशातील सुमारे ४०० मजुरांना या गावात रोजगार देण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक पोल्ट्रीधारकाकडे स्वतःची फीड मिल असून, त्यापैकी ७५ मिल ३० अश्वशक्ती आणि ५ मिल ५० अश्वशक्ती क्षमतेच्या आहेत. पक्ष्यांसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन काही वेळा टँकरद्वारे करावे लागते.

अंड्यांच्या किमतीत वाढ

यावर्षी गुजरात-धुळे सीमेवरील नवापूर तसेच दक्षिण भारतातील काही हॅचरीज कंपन्यांनी रोगनियंत्रणासाठी सुमारे तीन महिने उत्पादन बंद ठेवल्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. परिणामी, पक्ष्यांची उपलब्धता कमी झाल्याने ब्रॉयलर अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या अंडी साडेसहा रुपये प्रति नग या घाऊक दराने विक्री केली जात आहेत.

Web Title: Success story of devkauthe village in sangamner ahilyangar earning 45 lakh rupees daily by selling eggs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • poultry
  • Sangamner

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
1

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी
2

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर
3

Ahilyanagar News: अहिल्यानगर मनपा निवडणुकीत महायुतीत फूट; नाराज उमेदवारांचे पक्षांतर

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
4

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.