Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जादूटोणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा! पोटे पती-पत्नीवर गुन्हा दाखल

हल्ली जादूटोणा करून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. अशीच एक घटना संगमनेर तालुक्यातील गावात घडली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 05:52 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • जादूटोणाच्या नावाखाली कुटुंबाची आर्थिक लूट
  • पोटे पती-पत्नीवर गुन्हा दाखल
  • जणू घ्या संपूर्ण प्रकरण
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांबुत खुर्द गावात जादूटोणा व संमोहनाच्या आमिषाने एका कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब पोटे आणि त्याची पत्नी सिंधू बाळासाहेब पोटे या दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची सुरुवात सन 2014 पासून झाल्याचे समोर आले आहे. जांबुत खुर्द येथील शरद कैलास डोंगरे यांच्या घरी बाळासाहेब पोटे व त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती आली होती. “तुमचे सर्व काही चांगले करून देतो” असे सांगत त्यांनी घरातील ज्येष्ठ सदस्यांशी गोड बोलून रोख 5 हजार रुपये व एक बकरू घेऊन गेले.

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

सन 2015 मध्ये पुन्हा पोटे व त्याचा साथीदार डोंगरे यांच्या घरी आले. यावेळी संमोहन करून घरातील आईकडून 1 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर जुलै 2025 मध्ये पोटे याने दोन व्यक्तींना घरी पाठवून आश्रम शाळेसाठी धान्य लागते असे सांगून एक गोणी बाजरी व 600 रुपये रोख रक्कम घेऊन गेल्याचा आरोप आहे.

दरम्यान, डोंगरे कुटुंबातील आईचे तसेच भावजयी दिपाली सुरेश डोंगरे यांचे सुमारे 5 लाख रुपयांचे दागिने गायब झाल्याचेही निष्पन्न झाले. या संदर्भात विचारणा केली असता घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या सर्व प्रकारामुळे कुटुंबातील आईची मानसिक स्थिती बिघडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Nagpur Municipal Election: कुणाला पतंग, तर कुणाला टॉर्च, ट्रक…; नागपूर महापालिकेसाठी अपक्षांना चिन्हांचे वाटप

जादूटोणा व संमोहनाच्या माध्यमातून सोने, पैसे, बकरू व धान्य असा ऐवज लुटल्याप्रकरणी शरद कैलास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 अंतर्गत बाळासाहेब पोटे व सिंधू बाळासाहेब पोटे या जोडप्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहेत.

Web Title: Fraud of lakh rupees under black magic in ghargaon sangmner ahilynagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Sangamner

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: नवराष्ट्रचा थेट इम्पॅक्ट! संगमनेरमध्ये तब्बल 3 लाखांचे गोमांस केले जप्त
1

Ahilyanagar News: नवराष्ट्रचा थेट इम्पॅक्ट! संगमनेरमध्ये तब्बल 3 लाखांचे गोमांस केले जप्त

Ahilyanagar News: पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक! टाळ-मृदंगाच्या निनादात शेतकरी उतरले थेट कालव्यात
2

Ahilyanagar News: पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक! टाळ-मृदंगाच्या निनादात शेतकरी उतरले थेट कालव्यात

Ahilyanagar News : भीमजयंतीचा ऐतिहासिक महाकुंभ; निळ्या अलोट जनसागराने अनुभवला ‘समतेचा सोहळा’
3

Ahilyanagar News : भीमजयंतीचा ऐतिहासिक महाकुंभ; निळ्या अलोट जनसागराने अनुभवला ‘समतेचा सोहळा’

Ahilyanagar News: राहत्यात अवैध्य व्यवसाय तेजीत, नागरिक कार्यक्षम पोलीस नेतृत्वाच्या प्रतीक्षेत
4

Ahilyanagar News: राहत्यात अवैध्य व्यवसाय तेजीत, नागरिक कार्यक्षम पोलीस नेतृत्वाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.