Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किशोरी पेडणेकर-रितू तावडे आमनेसामने; महापौर कार्यालयात ट्रेसपासिंगचा आरोप, गुन्हा दाखल करण्याचा इशारा

मुंबई महापालिकेतील महापौर कार्यालयात झालेल्या वादानंतर महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर ट्रेसपासिंग आणि गैरवर्तनाचा आरोप करत पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला आहे. तर पेडणेकर यांनी हे आरोप फेटाळत महापौरांकडून पत्रांना उत्तरच दिले जात नसल्याचा आरोप केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 03, 2026 | 09:37 PM
किशोरी पेडणेकर-रितू तावडे आमनेसामने; महापौर कार्यालयात ट्रेसपासिंगचा आरोप, गुन्हा दाखल करण्याचा इशारा

किशोरी पेडणेकर-रितू तावडे आमनेसामने; महापौर कार्यालयात ट्रेसपासिंगचा आरोप, गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर कार्यालयात पत्रांना उत्तर मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत महापौरांकडून “बालिश आरोप” केले जात असल्याचा पलटवार केला आहे.

‘ट्रेसपासिंग’ आणि गैरवर्तनाचा आरोप

पत्रकार परिषदेत बोलताना महापौर रितू तावडे यांनी दावा केला की, किशोरी पेडणेकर यांनी परवानगीशिवाय महापौर कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली, मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवून कार्यालयात फिरत कागदपत्रे चाळली आणि छायाचित्रे घेतली.

तावडे म्हणाल्या की, “कॅमेरा ऑन करून महापौर कार्यालयात ट्रेसपासिंग करण्यात आले. ही कृती विरोधी पक्षनेत्याला शोभणारी नाही. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे पत्र पोलिसांना देणार आहे.” तसेच, मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

‘मुंबईच्या महापौर आणि भाजप मुंबई अध्यक्ष दोघेही बेशरम.’ अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर वर्षा गायकवाड भडकल्या

‘माझा महापौरांच्या दालनाशी संबंधच नाही’

रितू तावडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी ते सर्व आरोप फेटाळले. त्या म्हणाल्या, “माझा महापौरांच्या दालनाशी काडीमात्र संबंध नाही. मी महापौर जिथे बसतात त्या दालनात गेलेच नाही. मी एमएस विभागात गेले होते. तिथे ३० मार्चपासून दिलेल्या पत्रांबाबत उत्तर का दिले जात नाही, एवढाच प्रश्न विचारला.”

‘पत्रांना उत्तरच मिळत नाही’

पेडणेकर यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्वी विशेष सभा घेण्याबाबत, रक्तपेढीसह विविध विषयांवर अनेक पत्रे दिली; मात्र एकाही पत्राला उत्तर मिळाले नाही. “मला गुळगुळीत बोलता येत नाही. माझ्या अखत्यारितील अधिकाऱ्यांना मी प्रश्न विचारला तर त्यात गैर काय? एमएस सांगतात की, पत्रांचे मसुदे तयार होतात; पण महापौरांच्या स्वाक्षरीअभावी ती पाठवली जात नाहीत,” असा दावा त्यांनी केला.

‘मुंबईकर माफ करणार नाहीत’; अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरे यांचा घणाघात, ‘क्रूर विनोद करणाऱ्याला पदावरून हटवा’

गोपनीय कागदपत्रांचा प्रश्नच नाही

गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढल्याच्या आरोपावर पेडणेकर म्हणाल्या, “मी माझ्या कार्यालयात फोटो काढले आहेत. कोणती गोपनीयता भंग केली, हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्हीही महापौर होतो. कोणत्याही पत्राला आठ दिवसांत उत्तर देणे ही महापौर कार्यालयाची जबाबदारी असते.”

वाद आणखी चिघळण्याची शक्यता

महापौर रितू तावडे यांनी पोलिसांत तक्रार देण्याची भूमिका घेतली असून, किशोरी पेडणेकर यांनीही आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे हा वाद केवळ शाब्दिक आरोप-प्रत्यारोपांपुरता न राहता कायदेशीर पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Kishori pednekar ritu tawde bmc mayor office controversy fir demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • BMC
  • Kishori Pednekar
  • Ritu Tawde

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Murder Case : ‘रश्मी ठाकरेंचं नाव का घेता?’ किशोरी पेडणेकरांचा थेट सवाल, मीनाक्षी शिंदेंना सुनावलं
1

Pradeep Purnekar Murder Case : ‘रश्मी ठाकरेंचं नाव का घेता?’ किशोरी पेडणेकरांचा थेट सवाल, मीनाक्षी शिंदेंना सुनावलं

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
2

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.