
कोल्हापूर /राजेंद्र पाटील : जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांनी मुहूत काढण्यास सुरुवात करण्याअगोदरच महायुतीत काहीसे नाराजीचे नाट्य पहावयास मिळत आहे. भाजपाने जास्तीत जास्त नगराध्यक्ष पदाच्या जागा लढविण्याचे निश्चित करून सात उमेदेवारांना एबी फॉर्मचे वाटपही केले आहे. भाजपाने महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात न घेता सात जागांवर हक्क सांगितल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी देखील स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असा संदेश दिला आहे.
एकंदरीत या घडामोडी नंतर महायुतीच्या एका जेष्ठ नेत्याने घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून वाटाघाटीनंतर शिक्कामोर्तब होईल असे सांगीतले. नगरपालिका, नगरपंचायतीच्यानिवडणुका जाहीर झाल्यानंतर सध्या उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. राज्यात भाजप घटक पक्षांची महायुती सत्तेत आहे. त्यामुळे नगरपालिकांवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र स्थानिक गटातटाच्या राजकारणांमुळे युती करण्यात अडचणी येत आहेत. मात्र 13 पैकी 7 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे लढविण्यात येणार आहे. उर्वरित जागांवर वाटाघाटी सुरू असल्याचे सुत्रांची माहिती आहे.
जिल्ह्यात जयसिंगपूर, शिरोळ, वडगाव, कुरुंदवाड, गडहिंग्लज, हुपरी, कागल, पन्हाळा, कागल, पन्हाळा, मलकापूर आणि मुरगूड या दहा नगरपालिका तर आजरा, चंदगड आणि हातकणंगले या तीन नगरपंचायत आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी याची महायुतीआहे तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटयांची महाविकास आघाडी आहे. महायुतीआणि महाविकास आघाडीचे युती- आघाडीबाबत अद्याप चित्र अस्पष्ट आहे.भारतीय जनता पक्षाने सर्व म्हणजे10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाकडून निवडणूकलढणाऱ्या उमेदवारांना एबी फॉर्म वितरितकेले आहेत. मात्र घटक पक्षांशी अद्यापवाटाघाटी सुरू असल्याने किती जागा लढविणार स्पष्ट केले नाही.
चर्चनंतरच होणार महायुतीचे चित्र स्पष्ट
भाजपाने 13 पैकी 7 जागांवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करून राष्ट्रवादी व शिवसेनेची मोठी कोंडी केली आहे. फक्त ३ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या जागाच राष्ट्रवादी व सेनेला लढाव्या लागतील मात्र अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने यावर कोणता मार्ग काढला जातोय हे पहावे लागेल.
आबिटकरांचे मौन ?
मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वबळाची घोषणा करून राष्ट्रवादीची अधिकृत घोषणा केली, मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या सेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी मात्र अद्याप यावर कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल आहे असे वाटत नाही.
Ans: भाजपाने स्वत:हून 7 पदांवर कब्जा जाहीर केला आणि वाटाघाटी न करता उमेदवार निवडले. त्यामुळे घटक पक्षांना फार कमी जागा मिळतील अशी भीती आहे.
Ans: भाजपाने 7 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करून फॉर्मही दिले आहेत. उर्वरित जागांवर वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले आहे.
Ans: जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपाने महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात न घेता 13 पैकी 7 नगराध्यक्ष पदांसाठी एबी फॉर्म वाटप केले. यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेत नाराजी निर्माण झाली.