Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई

सुरुवातील मोबाइल कार्यान्वित करण्यासाठी वर्षभरासाठी एक हजार रुपयांचे रिचार्ज मारून देण्यात आले होते. काही महिन्यांतच मोबाइलमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 14, 2026 | 03:14 PM
Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई

Chandrapur News: शासनाची अर्धवट योजना? फोन मिळाले, पण रिचार्जसाठी सेविकाच त्रस्त; पैसे जमा करण्यास दिरंगाई

Follow Us
Close
Follow Us:
  • मोबाइल दिले पण रिचार्जच नाही! अंगणवाडी सेविकांची अडचण वाढली
  • रिचार्ज अभावी काम ठप्प? अंगणवाडी सेविकांवर आर्थिक ताण
  • खिशातून रिचार्ज? अंगणवाडी सेविकांना बसला भुर्दंड
चंद्रपूर: जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून अंगणवाड्या चालविल्या जातात. अंगणवाड्यांतील कामकाज सुलभ होण्याच्या दृष्टीने अंगणवाडीसेविकांना मोबाइल देण्यात आले. त्याचवेळी त्यांना वर्षभराचे रिचार्ज मारून देण्यात आले. आता मात्र रिचार्जचे पैसे खात्यावर जमा करून देण्यास विभागाची चालढकल सुरू आहे. या सेविकांना आवश्यक कामे ऑनलाइन करावी लागत असल्याने गत काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांनाच रिचार्ज करून कामे करावी लागत असल्याचे चित्र आहे.

Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

जिल्ह्यात २२०० अंगणवाड्या आहेत. त्यात ४४०० अंगणवाडीसेविका आणि मदतनिस कार्यरत आहे. काही अंगणवाड्या स्वमालकीच्या, तर काही किरायाच्या घरात, समाजमंदिरात भरविल्या जात आहे. अलीकडेच महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्‌या बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. मधल्या काळात अंगणवाडीसेविकांना कामकाज करता यावे, यासाठी मोबाइल देण्यात आले. मुलांची हजेरी, आहार नोंदणी, लसीकरण, सर्वेक्षण, गर्भवती महिला, स्तनदा मातांची नोंदणी, शून्य ते सहा वयोगटातील बालकांची नोंदणी करणे यासह अन्य कामांसाठी अंगणवाडीसेविकांना मोबाइल देण्यात आले.

सुरुवातील मोबाइल कार्यान्वित करण्यासाठी वर्षभरासाठी एक हजार रुपयांचे रिचार्ज मारून देण्यात आले होते. मात्र, देण्यात आलेले मोबाइल हलक्या कंपनीचे होते. त्यामुळे काही महिन्यांतच मोबाइलमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. कामेच होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीसेविकांनी सर्व मोबाइल महिला व बालकल्याण विभागाकडे परत दिले. त्यानंतर विभागाने एका मोठ्या कंपनीचे मोबाइल विकत घेऊन अंगणवाडीसेविकांना देण्यात आले होते. त्यामुळे अंगणवाडीसेविकांचे काम सोपे झाले.

अंगणवाडीसेविका स्वतःच करतात रिचार्ज

कामकाज सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीसेविकांना रिचार्ज करून देण्यात आले होते. त्यानंतर रिचार्जचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होते. मात्र, गत काही महिन्यांपासून रिचार्जचे पैसेच खात्यावर जमा होत नसल्याचे अंगणवाडीसेविकांचे म्हणणे आहे. २०२४ मध्ये तब्बल १० महिन्यांचे, तर आता जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांचे रिचार्जचे पैसे खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे या कालावधीत अंगणवाडीसेविकांना स्वतः रिचार्ज करून कामे करावी लागत असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महिलांचे म्हणणे आहे.

अंगणवाडी सेविकांना तीन, तीन महिन्यांचे रिचार्जचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करून देण्यात येत आहे. काहींच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास त्यांनी प्रकल्प कार्यालयात कळवावे.- भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जि.प.

Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

अंगणवाडी सेविकांवर कामाचा व्याप आहे. कामासाठी त्यांना मोबाइल देण्यात आले. मात्र, रिचार्जचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यास राज्य शासन दिरंगाई करीत आहे. कोरोना काळात एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे कबूल करण्यात आले. मात्र, तेही त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जमा करण्यात आले नाही. – प्रा. रमेशचंद्र दहीवडे, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Anganwadi workers in chandrapur struggle as phones arrive without recharge funds chandrapur news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?
1

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?

Ahilyanagar News: बहुचर्चित साकळाई योजनेला अखेर मंजुरी! 32 दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला
2

Ahilyanagar News: बहुचर्चित साकळाई योजनेला अखेर मंजुरी! 32 दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट
3

भारतीय नौदल पाकवर हल्ला करणार होते! नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांचा गौप्यस्फोट

Sangli News : गॅस टंचाईचा फटका; सांगलीत LPG पंप बंद, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ
4

Sangli News : गॅस टंचाईचा फटका; सांगलीत LPG पंप बंद, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.