Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Politics : विरोधी पक्षनेते राहुल गांधी 1 नोव्हेंबरला काढणार रॅली; भाजपला आता टेन्शन

निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात लढणाऱ्या इंडिया ब्लॉकने आता महाभियोगाचे कार्ड खेळले आहे. विरोधी पक्षांची ही आघाडी ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये एका प्रातिनिधिक संसदेचे आयोजन करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 25, 2026 | 07:26 AM
राहुल यांच्या रॅलीने भाजपला टेन्शन

राहुल यांच्या रॅलीने भाजपला टेन्शन

Follow Us
Follow Us:
  • रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसकडून रॅली
  • माजी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर साधला निशाणा 
  • रॅली पुढे ढकलण्याची व्यापाऱ्यांची मागणी
नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसकडून रॅली काढली जाणार आहे. या रॅलीवरून भाजपने हल्लाबोल केला आहे. १९८४ मध्ये १ नोव्हेंबरलाच शीखांचा नरसंहार झाला होता. मग काँग्रेसने रॅलीसाठी याच दिवसाची निवड का केली, असा सवाल भाजपने उपस्थित केला. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपने हा राहुलचा ‘बालहट्ट’ असल्याचे म्हटले आहे. या माध्यमातून ते शीख समुदायाच्या जखमांवर मीठ चोळत आहेत.

देशातील शीख समुदाय आणि सामान्य जनता हे स्वीकारणार नाही, असे भाजपने म्हटले. माजी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. सत्तेबाहेर असल्यामुळे राहुल अस्वस्थ झाले असून, अराजक करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रसाद यांनी केला. भाजपच्या आक्रमक भूमिकेवर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप टेन्शनमध्ये आहे. जनतेला आता पोकळ आश्वासने नव्हे, तर पारदर्शक कारभार हवा, हे भाजपला समजले आहे. असा कारभार काँग्रेस आणि इंडिया आघाडीच देऊ शकते. त्यामुळे भाजपची चिंता वाढत असून, आता त्यांच्या स्वप्नातही काँग्रेस आणि राहुल येत आहेत, असा टोला खेरा यांनी लगावला.

Donald Trump Tariff U Turn : आधी टॅरिफची धमकी, आता यु – टर्न! ट्रम्प यांनी 50 % टॅरिफ घेतला मागे; अचानक का मारली पलटी?

रॅली पुढे ढकलण्याची व्यापाऱ्यांची मागणी

दिल्लीतील व्यापारी संघटना सीटीआयने काँग्रेस व राहुल यांना रामलीला मैदानावरील रॅली ८ नोव्हेंबरनंतर आयोजित करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. तोपर्यंत दिवाळी संपलेली असेल आणि व्यापाराचे नुकसान टाळता येईल, असे संघटनेने म्हटले. रामलीला मैदानाच्या आसपास अनेक घाऊक बाजार आहेत. या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी येत असतात. मात्र, रॅलीमुळे होणाऱ्या गैरसोयींच्या भीतीने व्यापारी बाजारात येण्याचे टाळू शकतात. त्यामुळे हजारो कोटीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सीटीआयने म्हटले आहे.

30 ऑक्टोबरला मॉक संसद

निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात लढणाऱ्या इंडिया ब्लॉकने आता महाभियोगाचे कार्ड खेळले आहे. विरोधी पक्षांची ही आघाडी ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये एका प्रातिनिधिक संसदेचे आयोजन करत आहे, ज्याद्वारे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्याच्या प्रक्रियेचा प्रतिकात्मक सराव केला जात आहे. या प्रातिनिधिक संसदेचा मुख्य उद्देश निवडणूक आयोगाच्या कामकाजाचा आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेचा निषेध करणे हा आहे.

FAQ

राहुल गांधी कधी काढणार रॅली?
– लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे १ नोव्हेंबरला रॅली काढणार आहेत.

व्यापाऱ्यांनी काय केली मागणी?
– दिवाळीच्या काळात रॅली आणि रस्ते अडवल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन सुमारे १०००० कोटी रुपयांच्या व्यवसायात अडथळा निर्माण होईल, या भीतीपोटी ही मागणी करण्यात आली आहे.

आंदोलने, मोर्चांमुळे व्यापाऱ्यांचे किती नुकसान?
– गेल्या काही महिन्यांत सततच्या आंदोलनांमुळे आणि रस्ते बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे अंदाजे ४००० कोटी रुपयांचे व्यावसायिक नुकसान झाले आहे.

Web Title: Leader of the opposition rahul gandhi to hold a rally on november 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 07:18 AM

Topics:  

  • Congress Politics
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती
1

‘दिवाळीत धंदा बुडवू नका!’ Rahul Gandhi यांच्या रॅलीवरून दिल्लीतील व्यापारी आक्रमक; 10000 कोटींच्या व्यापारावर परिणामाची भीती

Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार
2

Five Former CMs Rejoin Congress:पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा अधिक आक्रमक होणार

काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास
3

काँग्रेसची 200 जागांची यादी सादर; लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाचा वाढला आत्मविश्वास

मोठी बातमी ! मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; ‘त्या’ फोटोमुळे अडचणींत वाढ?
4

मोठी बातमी ! मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; ‘त्या’ फोटोमुळे अडचणींत वाढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.