Maharashtra State Budget 2025 Session, Maharashtra Assembly Budget Live
Maharashtra Assembly Budget Session 2025 Live : मुंबई – देशानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. राज्यामध्ये महायुतीचे सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष हे अर्थसंकल्पाकडे लागले आहे. यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिलमाफी मिळणार का? लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार का? तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार का? आणि नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे यंदा अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का?
राज्याच्या अर्थसंकल्पाकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. मागील वर्षी निवडणूक समोर ठेवून महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना बजेटमधील सर्वात लोकप्रिय योजना आणि घोषणा ठरली होती. निवडणुकीमध्ये देखील महायुतीसाठी ती गेमचेंजर ठरली होती. मात्र निवडणुकीमध्ये महायुतीने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन या अर्थसंक्लपामध्ये पूर्ण होणार का याची सर्वांना उत्सुकता लागील आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वाढवून दिला जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्यामध्ये सर्वांचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी कोणत्या घोषणा होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. याची पूर्तता अर्थसंकल्पामध्ये होणार का याकडे शेतकऱ्यांच्या अपेक्षा लागल्या आहेत. राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे महायुतीच्या या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या थकित कर्जाची कर्जमाफी आणि थकीत वीजबिल माफ होणार का याबाबत अर्थमंत्री अजित पवार हे काय घोषणा होणार ते पाहावं लागेल. त्याचबरोबर उद्योगक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, रोजगार निर्मिती यासाठी देखील राज्य सरकार कोणते निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार 11 व्यांदा करणार सादर
आपल्या राज्याचे आत्तापर्यंत 78 वेळा अर्थसंकल्प सादर झाले आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा विद्यमान अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. यंदा अजित पवार हे 11 व्यांदा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. सर्वांत जास्त सादर करणाऱ्यांमध्ये अजित पवार हे सध्या तरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जयंत पाटील यांनी यापूर्वी 10 अर्थसंकल्प सादर केले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी 09 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. सर्वांत जास्त अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा माजी अर्थमंत्री दिवंगत बॅ. शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.