Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…

सीईटी परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 12, 2026 | 01:39 PM
सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास...

सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास...

Follow Us
Follow Us:
  • सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली
  • एआय आन् डिजिटल साधनांवर बंदी
  • गैरप्रकार झाल्यास केंद्राची मान्यता कायमची रद्द
पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या २०२६ च्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) नोंदणीची मुदत संपत आली असून, आतापर्यंत १२ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच तीन अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी दोन संधी देण्यात आल्यामुळे सुमारे १७ लाख ३९ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे.

 

सीईटी कक्षाकडून १७ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यापैकी १५ परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उमेदवार, परीक्षा कर्मचारी किंवा संस्थांकडून कोणताही गैरव्यवहार, गैरवर्तन किंवा अनुचित मार्गांचा वापर झाल्यास कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी गैरप्रकारांचे स्वरूप लक्षात घेऊन शिक्षा आणि दंड निश्चित करणारी सुधारित नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान बोलणे, संकेत देणे, कॉपी करणे, नोट्स किंवा लिखित साहित्य वापरणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रश्न किंवा उत्तरे पाठविणे, तोतयागिरी करणे किंवा सामूहिक नक्कल करणे अशा प्रकारांना गंभीर गैरप्रकार मानण्यात आले आहे. अशा प्रकरणांत चालू शैक्षणिक वर्षातील सीईटीसह इतर परीक्षांसाठीची उमेदवारी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

एआय आन् डिजिटल साधनांवर बंदी

नवीन नियमावलीनुसार परीक्षेदरम्यान स्मार्टफोन, मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, कॅल्क्युलेटर (जिथे प्रतिबंधित असेल) यांसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट बाळगणे किंवा वापरणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधने, लपविलेले कॅमेरे, स्क्रीन मिररिंग, रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअर किंवा अन्य डिजिटल साधनांचा वापर केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करून आयटी कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिस अन् महानगरपालिका प्रशासनाचा मोठा निर्णय; येत्या 8 दिवसात…

गैरप्रकार झाल्यास केंद्राची मान्यता कायमची रद्द

परीक्षा केंद्रांसाठीही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था, बायोमेट्रिक पडताळणी आणि कडक देखरेख बंधनकारक करण्यात आली आहे. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता तात्पुरती किंवा कायमची रद्द करण्याचा अधिकार सीईटी कक्षाला राहणार आहे.

हे सुद्धा वाचा : स्वीकृत नगरसेवकांना निधी मिळणार की नाही? अधिकृत नियुक्तीआधीच स्थायी समिती अंदाजपत्रक मांडण्याची शक्यता

Web Title: Revised rules for cet exam have been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • CET Exam
  • exam tips
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
1

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
2

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
3

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
4

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.