
भुजबळांनी उलगडला फडणवीसांसोबतचा संवाद; तर उद्याच शपथविधी होण्याची शक्यता (Photo Credit- X)
छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि मी स्वतः त्यांच्याशी शपथविधीच्या वेळेबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय येत्या दोन तासांत होईल आणि शपथविधी सोहळा उद्याच (शनिवारी) पार पडण्याची शक्यता आहे.” यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “यात कोणतीही अडचण नाही, पुढील एक-दोन तासांत सर्व बाबी अंतिम केल्या जातील.”
#WATCH | Mumbai: Maharashtra Minister Chhagan Bhujbal says, “We went to meet the CM. Praful Bhai, Tatkare, I, and Munde. We also met him last night. We asked if everything could be done tomorrow, from the swearing-in ceremony to everything else. The Chief Minister said he had no… pic.twitter.com/pQfrYK4NzW — ANI (@ANI) January 30, 2026
अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भावना लक्षात घेता, सुनेत्रा ताईंना ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, छगन भुजबळ यांच्या मते, यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही, तरीही सस्पेन्स आता अंतिम टप्प्यात आहे.
अजितदादांच्या निधनामुळे पक्षात आणि राज्यात शोककळा आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले की, “एखाद्या नेत्याच्या निधनानंतर तीन किंवा दहा दिवसांचा शोक पाळला जातो. अशा काळात राजकीय निर्णय घेण्याबाबत काही संकेत असतात. या सर्व तांत्रिक बाबींचा तपास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल करत आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर होईल.” काल रात्री आणि आजही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रशासकीय आणि राजकीय पोकळी भरून काढण्याबाबत चर्चा केली. राज्याचा अर्थसंकल्प आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच राहतील, याची खात्रीही या भेटीदरम्यान देण्यात आल्याचे समजते.