
Praful Patel and Chhagan Bhujbal met with CM Devendra Fadnavis for NCP National President
अजित पवारांचे विश्वासू नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ खातं, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याचा कारभार होता. त्यामुळे आता या खात्यांचा कारभार कोणाकडे द्यायचा आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे द्यायचं याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.
हे देखील वाचा : NCP Politics : अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; यापुढे ना प्रचार ना सभा
अजित पवार यांची सर्व खाती राष्ट्रवादीकडेच ठेवण्याची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले की अजित पवार यांच्याकडे असलेली खाते राष्ट्रवादीकडेच राहावीत. शिवाय, पक्षात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याची मागणीही पुढे आली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी संघटनात्मक नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अधिकृतपणे नियुक्ती करावी, असा आग्रह पक्षाचे वरिष्ठ नेते धरत आहेत.
सुनेत्रा पवार हाती घेणार सुत्रे?
अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एक प्रवाह सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची मागणी करत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्षपद येण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांच्या नावाला जास्त पसंती राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि समर्थकांकडून दिली जात आहे.
हे देखील वाचा : “तुमच्याविषयी देखील माझी तक्रार..; Rohit Pawar यांचे अजित पवारांना भावनिक पत्र, वाचून येईल डोळ्यात पाणी
सुनेत्रा पवार राज्यात पार्थ पवार केंद्रात
अजित पवार यांच्या पत्नी सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. अजित पवारांनंतर आता सुनेत्रा पवार या पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीमध्ये पाठवण्याची शक्यता आहे.