Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्र हा मोदी-शहा गुलामांची वसाहत…’; महाविकास आघाडीच्या नेत्यांची घणाघाती टीका

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूमुळे सत्ताधारी नेते सुद्धा सुरक्षित नसल्याची टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 13, 2024 | 02:43 PM
Mahavikas Aghadi Joint Press Conference in mumbai

Mahavikas Aghadi Joint Press Conference in mumbai

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. तसेच जागावाटपावरुन बोलणी सुरु असून चर्चा देखील केल्या जात आहेत. दरम्यान, मविआच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी महायुतीमधील भष्ट्राचारांची यादी असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले की, “महायुती सरकारच्या भष्ट्राचाराची अनेक उदाहरण देता येतील. काल या भागामध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. सत्ता पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत. आधी आम्ही विचारत करत होतो की राज्यात महिला अन् शाळेत जाणाऱ्या 5 वर्षांच्या मुली सुरक्षित नाही. तर या घटनेमुळे राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत, हे समोर आले आहे. तर मग जनतेची काय स्थिती असेल. यांचा आता राजीनामा नाही तर यांना जनताच सत्तेवरुन उतरवेल. फक्त स्वतः राजकारण करणं हाच राज्य सरकारचा मानस आहे. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना सुद्धा असंविधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे. यामुळे पोलिसांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मतभेद झाले आहेत. त्यांच्यामुळे राज्यातील सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत,” अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे.

हे देखील वाचा : बाबा सिद्दिकींच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,’आम्हाला सगळ्यांनाच धक्का’

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “या सरकारचं म्हणजे गद्दारीचा पंचनामा आहे. यामध्ये गद्दारी फक्त राष्ट्रवादी किंवा शिवसेना पक्षासोबत झालेली नाही. तर ही गद्दारी महाराष्ट्रासोबत झाली आहे. जणू काही महाराष्ट्र हा मोदी-शहा गुलामांची वसाहत झाली आहे, अशा पद्धतीने हे सरकार चालवत आहेत. हे सरकार आता घालवलं पाहिजे. सर्व बाबतीत बोजबारा उडालेला आहे. दोन पोलीस कमिशनर असलेले मुंबई हे शहर आहे. पण कारभाराचा काय? महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत तर सामान्य जनेतेचे काय? जेवढी गद्दारांना, त्यांच्या समर्थकांना आणि कुटुंबाला जेवढी सुरक्षा देण्यात आली आहे. ती काढून जनतेसाठी वापरा. मला वाटतं ह्यांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्यांना पण सुरक्षा दिली असेल. ही पोलिसांची सुरक्षा जनतेच्या रक्षणासाठी आहेत. हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही. कारभाराची जबाबदारी घेत नाहीत,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: Mahavikas aghadi nana patole uddhav thackeray sharad pawar press conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • congress nana patole
  • Udhav Thackeray
  • Vidhansabha Election 2024

संबंधित बातम्या

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर
1

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

काँग्रेसचा उद्या ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा; ‘हे’ बडे  नेते राहणार उपस्थित
2

काँग्रेसचा उद्या ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…
3

हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन, म्हणाले; आता 272 जागांवर…

संघटना मजबुतीसाठी काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित
4

संघटना मजबुतीसाठी काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.