
Manisha Kayande : 'चोर मचाये शोर', एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या विश्वासू असलेल्या कायंदेचा ठाकरे गटावर निशाणा
ठाकरे बंधुंच्या मोर्चावर भाष्य करताना कायंदे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमूख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भातही वक्तव्य केले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर होत असलेल्या टिकेचा त्यांनी समाचार घेतला.
डॉ. मनीषा कायंदे यांनी ठाकरे बंधुंच्या मोर्च्यावर भाष्य करताना दिशा सालियन मृत्युप्रकरणावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, दिशा सालियनचे वडील मागील सहा वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू असल्याचं वक्तव्य केलं. तसेच दिशा सालियन यांच्या वडिलांनी मातोश्रीवर नोटीस देण्यासाठी गेले होते, तसेच कोर्टाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिल्याचेही कायंदे यांनी सांगितले.
यावेळी पूर्णेकर हत्याकांडात राजकीय नेत्यांकडून आरोप होत असलेल्या मीनाक्षी शिंदे यांच्यावरील आरोप सिद्ध करावे असे आव्हान कायंदे यांनी ठाकरे गटाला केले. किशोरी पेडणेकरांवरील आरोपांचा दाखला देत ‘चोर मचाये शोर’ अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली.
तसेच रविवारच्या गर्जना मोर्चाला परवानगी नसतानाही ठाकरे बंधुंनी मोर्चा काढला. ठाकरे बंधुंचा शिवाजी पार्कात आंदोलन करण्याचा हट्ट होता, मात्र पोलिसांनी त्यांना आजाद मैदानात आंदोलन करण्याचा सल्ला दिल्याचे कायंदे म्हणाल्या.
‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
ईव्हीएम, मतदार यादी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर दोषारोप केल्याची टीका कायंदे यांनी केली. विरोधकांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी निवडणूक आयोगाला जबाबदार धरल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे व अभिजीत दिपके हे तरुणांना भडकवत आहेत. तरुणांना नोकरी, शिक्षण आणि त्यांच्या प्रगतीची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
‘मुस्कान’ मोहिमेतून बेपत्ता तरुणी सापडल्याचा दावा
राज्यातील बेपत्ता मुलींचा मुद्दा गंभीर असल्याचे ते म्हणत ‘मुस्कान’ मोहिमेतून अनेक महिला व मुली सापडल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बेपत्ता 22 मुलींच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासह गृहखात्याने तातडीने त्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.