Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil On Mumbai March: मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil: पाटोद्यातील सभेत जरांगे पाटील म्हणले की, पुढच्या प्रवासात आपल्या मागे मोठ्या संख्येने वाहने घेऊन येऊ नका, उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे नको, माझ्या मागे आलात तर मी पुन्हा अंतरवाली सराटीत जाईन. नाहीतर पाटोद्यातच उपोषण सुरू करेल,” असा इशारा त्यांनी दिला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 16, 2026 | 09:59 AM
Maratha Reservation, Manoj Jarange Patoda Speech,

Maratha Reservation, Manoj Jarange Patoda Speech,

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाचा पहिला मुक्काम बीडमधील पाटोदा येथे.
  • नियोजित वेळेपेक्षा अत्यंत उशिरा मध्यरात्री २ वाजता पार पडली पाटोद्यातील सभा.
  •  मध्यरात्रीही जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी हजारो मराठा नागरिक व महिलांची गर्दी.
Manoj Jarange Patil hunger strike :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पहिल्या दिवसाचा (15 सप्टेंबर) मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे झाला. जरांगे पाटील यांची याठिकाणी सभाही आयोजित केली होती. पण नियोजित वेळेपेक्षा अत्यंत उशिरा म्हणजे मध्यरात्री तब्बल दोन वाजता जरांगे पाटील यांची पाटोदा येथे सभा पार पडली. विशेष म्हणजे, एवढ्या मध्यरात्रीही त्यांना ऐकण्यासाठी हजारो मराठा समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीचा उल्लेख करत पुढील दौऱ्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. “उपोषणात दौरा करणे सोपे नाही. शारीरिक त्रास प्रचंड वाढत आहे. त्यामुळे मी पुढचा दौरा रद्द करू शकतो. दौरा महत्त्वाचा नाही, आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून थेट मुंबईला जाईन” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर

आपल्या प्रकृतीपेक्षा आरक्षण महत्त्वाच आहे. दौरा महत्त्वाचा नाही. माझ्याकडून आता पुढचा दौरा शक्य होत नाही. प्रकृती सुधारली तर पुढील दौऱ्यात सहभागी होऊ, मात्र त्रास कायम राहिला तर प्रवास करणे शक्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘५८ लाख नोंदी मिळाल्या’

सततचे उपोषण, प्रवास आणि त्यातून होणारा शारीरिक थकवा यामुळे दौरा थांबवून थेट मुंबईच्या दिशेने जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुढील दिवसांत आपला दौरा सुरू ठेवतात की तो रद्द करून थेट मुंबईकडे रवाना होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, पाटोदा येथे जरांगे पाटील यांचा ताफा रात्री उशिरा दाखल झाला. एवढ्या उशिराची वेळ असूनही हजारो मराठा समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी आपल्या पुढील प्रवासाबाबत हे महत्त्वाचे संकेत दिले.

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

 

उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे नको

पाटोद्यातील सभेत जरांगे पाटील म्हणले की, पुढच्या प्रवासात आपल्या मागे मोठ्या संख्येने वाहने घेऊन येऊ नका, उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे नको, माझ्या मागे आलात तर मी पुन्हा अंतरवाली सराटीत जाईन. नाहीतर पाटोद्यातच उपोषण सुरू करेल,” असा इशारा त्यांनी दिला.

५८ लाख नोंदी मिळाल्या आहेत. या नोंदींच्या आधारे मोठ्या संख्येने समाज आरक्षणाच्या प्रक्रियेत जातील. आता गॅझेटसाठी प्रयत्न सुरू आहेत. पेनड्राइव्हमध्ये सगळ्या नोंदी घेतल्या आहेत. सरकारने काहीही म्हटलं तरी नोंदी आपल्या हातात आहेत. आता आपल्याकडे चेक आहे. आपण तो कधीही बँकेत टाकू शकतो. मराठे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत,” असं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं.

 

 

Web Title: Manoj jarange health issues hunger strike cancel tour head straight to mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Beed News
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा
1

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा इशारा

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’
2

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’

‘जरांगेंच्या भाषेवर मंत्र्यांचा संताप!’; कॅबिनेट बैठकीत फडणवीसांसमोर नाराजी, ‘हिंदू उत्सवातच मुंबईत आंदोलन का?’
3

‘जरांगेंच्या भाषेवर मंत्र्यांचा संताप!’; कॅबिनेट बैठकीत फडणवीसांसमोर नाराजी, ‘हिंदू उत्सवातच मुंबईत आंदोलन का?’

‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’; अजय बारस्करांचा थेट सवाल, ‘चार जणांसाठी जीव धोक्यात घालू नका’
4

‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’; अजय बारस्करांचा थेट सवाल, ‘चार जणांसाठी जीव धोक्यात घालू नका’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.