Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

Beed Suicide Case: परळीतील सिद्धार्थनगरमध्ये पतीच्या अनैतिक संबंधांना व सततच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने ॲसिड प्राशन करत टोкаचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 03, 2026 | 02:44 PM
Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

Beed Suicide Case: पतीचे अनैतिक संबंध आणि रोजच्या मारहाणीला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; ॲसिड प्राशन करून संपवले आयुष्य!

Follow Us
Follow Us:
  • पतीचे अनैतिक संबंध व छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
  • लातूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान ३१ ऑक्टोबरला मृत्यू
  • पती सुनील बदनेवर पोलिसांत गुन्हा दाखल 
Beed Suicide Case: बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील सिद्धार्थनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळजनक प्रकार घडला आहे. पतीचे बाहेरील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना आणि सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहित तरुणीने ॲसिड प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी माहेरच्या मंडळींनी गंभीर आरोप केले असून, पीडित महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पतीविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकन्या सुनील बदने (वय २५, रा. सिद्धेश्वर नगर, परळी वैजनाथ) असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहितेचे नाव आहे, तर सुनील सुरेश बदने असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील श्रीमंत पंढरी गित्ते (वय ५५, रा. नंदागौळ, ता. परळी वैजनाथ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

हेही वाचा: Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकन्या हिचा विवाह २०१९ मध्ये सुनील बदने याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही वर्षे त्यांचा संसार सुरळीत चालला. मात्र, त्यानंतर पतीने तिला दारू पिऊन मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, पतीचे इतर महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे देवकन्याच्या निदर्शनास आले. याबाबत तिने हा प्रकार आपल्या माहेरच्या मंडळींना सांगितला होता.

नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी एकत्र येऊन पती सुनील याची समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. याउलट पतीकडून होणारा सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास अधिकच वाढला. या सर्व त्रासाला आणि अपमानाला कंटाळून देवकन्या हिने राहत्या घरी बाथरुम साफ करण्याचे ॲसिड प्राशन केले. विषबाधेमुळे तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी लातूर येथे उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

हेही वाचा: Fake OSD Devendra Fadnavis:. मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

पतीवर गुन्हा दाखल व पोलिसांकडून तपास सुरू

वडिलांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार आरोपी पती सुनील बदने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक अनमोल keदार करीत आहेत. पतीच्या अनैतिक संबंध आणि छळामुळे एका तरुण संसार उद्धव्वस्त झाल्याने परळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली आहे?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील सिद्धार्थनगर भागात घडली आहे.

  • Que: मृत विवाहितेने काय पाऊल उचलले आणि त्याचे कारण काय होते?

    Ans: देवकन्या सुनील बदने (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव असून, पतीच्या अनैतिक संबंधांना व सततच्या छळाला कंटाळून तिने ॲसिड प्राशन करून आत्महत्या केली.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी कोणावर कारवाई केली आहे?

    Ans: मयत युवतीचे वडील श्रीमंत पंढरी गित्ते यांच्या तक्रारीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात पती सुनील सुरेश बदने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Eed parli married woman devkanya badne suicide acid sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Beed News
  • Crime . Crime News
  • crime news
  • Domestic Violence
  • suicide news

संबंधित बातम्या

Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…
1

Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…
2

वरणगाव हादरलं! उड्डाणपुलाखाली तरुणाला गाठून गोळ्या झाडल्या; तरुणीला भेटायला आला अन्…

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…
3

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

हातउसने दिलेले पैसे मागणे पडले महागात, गॅरेज चालकावर जीवघेणा हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.