Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची जरांगेंना विनंती

Manoj Jarange Pattil : मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’ असं म्हणत जरांगेंना आंदोलन टाळण्याची विनंती केली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 14, 2026 | 05:41 PM
'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक

'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; बावनकुळेंचं जरांगेंना आवाहन
  • जरांगे मुंबईकडे कूच करण्याच्या निर्णयावर ठाम
  • 18 जिल्ह्यांतील दुष्काळाचा अहवाल कॅबिनेटसमोर मांडणार
 

Manoj Jarange Patil : राज्यात एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून उपोषणावर असलेले जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आता जरांगे मुंबईकडे कूच करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांना आंदोलनाबाबत कळकळीची विनंती केली आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वात राज्यात आंदोलन करण्याची ही वेळ नाही, असं बावनकुळे म्हणाले.

“गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सर्वच पक्ष आणि व्यक्तींना विनंती करतो की, राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत,” अशी भूमिका बावनकुळे यांनी मांडली. गणपती बाप्पा महाराष्ट्राला विकासाची दिशा आणि एकजुटीची बुद्धी देण्यासाठी आले आहेत. हे दहा दिवस महाराष्ट्राला मजबुती देणारे असून या काळात समाजात कोणतंही गालबोट लागू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.

Manoj Jarange Mumbai Protest: सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?

जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम

दरम्यान, जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत. ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून आझाद मैदानावर उपोषण करण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असताना जरांगे आपला निर्णय बदलणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती दिली. 18 जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची आकडेवारी सरकारकडे आली असून हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘लँड टायटलिंग ऍक्ट’वरही मोठी माहिती

महसूल विभागाशी संबंधित 107 कॅबिनेट निर्णय घेण्यात आल्याचं सांगताना बावनकुळे यांनी राज्यात लवकरच ‘लँड टायटलिंग ऍक्ट’ आणला जाणार असल्याची माहिती दिली. मोजणी केल्याशिवाय मालमत्तेची रजिस्ट्री होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे हक्क सुरक्षित राहावेत, यासाठी महसूल विभाग काम करत असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री बळीराजा रस्ते योजनेवरही काम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आता एका बाजूला जरांगेंचं मुंबई आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका, यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Manoj jarange mumbai protest chandrashekhar bawankule ganeshotsav drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • chandrashekar bawankule
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Mumbai Protest:  सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?
1

Manoj Jarange Mumbai Protest: सलग दोनदा अर्ज फेटाळल्याने जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष; मराठा आंदोलनाची रणनीती बदलणार?

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

Manoj Jarange PC:  मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
3

Manoj Jarange PC: मी एकटाच मुंबईला जाणार, फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार: जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार
4

Maratha Reservation: मुंबईत जाऊन मरेन, शरण येणार नाही! Manoj Janrange यांचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.