Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर, हा सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल…’; मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर निशाणा

पंकजा मुंडे यांच्या भावनिक वक्तव्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी अनेक गंभीर दावे करत मराठा समाजाला त्रास देऊ नये, असा इशाराही दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 03, 2026 | 04:27 PM
'पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर, हा सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल...'; मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर निशाणा

'पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर, हा सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल...'; मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तीव्र प्रतिक्रिया
  • धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत दिला इशारा
  • मराठा आंदोलन आणि मुंडे कुटुंबाच्या राजकारणावर पुन्हा चर्चा
 

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच “राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं” असे भावनिक वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. त्यांच्या या विधानावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जर पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम होतील. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची क्षमता पंकजा मुंडे यांच्यात असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्याचवेळी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आणि सामाजिक समतोल बिघडू शकतो,” असा दावा केला.

जरांगे पाटील यांनी पुढे मराठा आंदोलनाचा उल्लेख करत धनंजय मुंडेंना इशाराही दिला. त्यांनी मराठा समाजाशी संघर्ष टाळण्याचा सल्ला देत, यापुढे मराठा समाजाला त्रास देऊ नये, असे म्हटले. तसेच आपल्या जीवावर झालेल्या कथित कटप्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. या संदर्भातील माहिती संबंधित यंत्रणांकडे असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

Pankaja Munde On Political Exit: कधी कधी राजकारणातून निवृत्त व्हावसं वाटतं..; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्व समाजाच्या पाठिंब्यावर मोठे झाल्यानंतरही त्यांनी कोणत्याही समाजाचे भले केले नाही. मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष वाढविण्याऐवजी सर्व समाजाला न्याय देणारे राजकारण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भविष्यातील राजकीय परिणामांचाही इशारा दिला.

दरम्यान, या संपूर्ण वादाची सुरुवात पंकजा मुंडे यांच्या एका भावनिक वक्तव्यामुळे झाली. परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना त्यांनी प्रवासादरम्यान “आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं,” असे म्हटले होते. मात्र, त्याच भाषणात त्यांनी नागरिकांच्या उत्साहामुळे नव्याने प्रेरणा मिळाल्याचेही स्पष्ट केले आणि विकासासाठी काम करत राहण्याची ग्वाही दिली होती.

‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’; पंकजा मुंडेंना काँग्रेसची थेट ऑफर, वडेट्टीवारांचे मोठे विधान

पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यानंतर विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता मनोज जरांगे पाटील यांच्या विधानाची भर पडली असून, त्यांच्या आरोपांवर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते आणि पुढील राजकीय घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Manoj jarange on pankaja munde retirement dhananjay munde marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • Manoj Jarang patil
  • Pankaja Munde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.