Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : ‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,’ जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीत आंदोलनाच्या 16व्या दिवशी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले. आंदोलनाला मदत करणाऱ्यांच्या चौकशीवरून सरकारवर आरोप करत त्यांनी 19 सप्टेंबरला मुंबईत उपोषण करण्याचा निर्धार कायम ठेवला.

  • By विवेक
Updated On: Sep 13, 2026 | 06:24 PM
'बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,' जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

'बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत,' जरांगे पाटलांची बावनकुळेंवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:
  • 15 सप्टेंबरला मुंबईकडे रवाना होणार; 19 सप्टेंबरला आझाद मैदानात उपोषण
  • आंदोलनाला मदत करणाऱ्यांच्या चौकशीवरून बावनकुळेंवर जरांगेंचा हल्लाबोल
  • एकनाथ शिंदेंनाही इशारा; ‘मराठ्यांचा विश्वास विसरू नका’ असा टोला
 

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या 16व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबई आंदोलनावर ठाम भूमिका घेतली. 15 सप्टेंबरला समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार असून, 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली.

‘बावनकुळे बाईच्या पदराआड लपून वार करतायेत, त्यांचे अधिकारी आता शनिवारी आणि रविवारीही काम करत आहेत,’ अश्या शब्दांत त्यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला. पाऊस असो किंवा ऊन, मराठा समाज मुंबईत येणारच, अशी आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली. आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या संसारावर परिणाम होऊ नये, याचीही काळजी घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. पाटोदा आणि श्रीगोंदा येथे मुक्काम करण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मदत करणाऱ्यांच्या चौकशीवरून सरकारवर निशाणा

आंदोलनासाठी आर्थिक किंवा इतर स्वरूपात मदत करणाऱ्या व्यक्तींवर चौकशी लावली जात असल्याचा आरोप जरांगेंनी केला. समाजातील श्रीमंत व्यक्तींनी आंदोलनाला मदत केली तर त्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना जरांगेंनी त्यांच्या यंत्रणेमार्फत आपल्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात असल्याचा दावा केला. नोटिसा, चौकशा किंवा दबाव आणून आंदोलन थांबणार नाही, उलट आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

उदय सामंत यांच्या भूमिकेवर जरांगेंचा सवाल

मुंबईतील आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या काळात अडचणी निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंत यांच्यावरही जरांगेंनी निशाणा साधला. गेल्या वर्षीही मुंबईत गणेशोत्सव होता आणि त्यावेळी मराठा समाजाने शांततेत आंदोलन केलं होतं, मग यंदाच हा मुद्दा का उपस्थित केला जातोय, असा सवाल त्यांनी केला. चौकशी आणि दबावाच्या माध्यमातून आंदोलन थांबवता येणार नाही. उलट त्यामुळे समाजाचा रोष आणखी वाढेल, असं जरांगे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनाही जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केलं. मराठा समाजाने शिंदेंवर विश्वास ठेवला, त्यांचा सन्मान केला आणि सरकारकडून मिळालेल्या निर्णयांचं स्वागत केलं, याची आठवण त्यांनी करून दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि सरकारसोबत सकारात्मक वातावरण तयार झालं, तर राजकीय समीकरणं बदलू शकतात, असा सूचक इशाराही जरांगेंनी दिला.

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

‘आता जे काही होईल ते मुंबईत होईल. कायदेशीर मार्गाने अर्ज केला आहे आणि न्यायालयाच्या अटी-शर्तींचं पालन करून आंदोलन करू. पण आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही मागे हटणार नाही,’ अशी ठाम भूमिका जरांगेंनी मांडली.

आता 15 सप्टेंबरला जरांगे पाटील नेमक्या किती समर्थकांसह मुंबईकडे रवाना होतात आणि 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानातील आंदोलनाबाबत प्रशासन काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Manoj jarange patil aggressive chandrashekhar bawankule mumbai protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील
1

Maratha Reservation आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; ‘तुमच्यासमोर गुडघे टेकणार नाही,’ परवानगी नाकारताच संतापले जरांगे पाटील

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
2

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
3

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

Manoj Jarange Patil : ‘दोन जन्म झाले तरी जरांगेंची मागणी मान्य होणार नाही’; सदावर्तेंचा थेट इशारा, ठाकरेंनाही सुनावलं
4

Manoj Jarange Patil : ‘दोन जन्म झाले तरी जरांगेंची मागणी मान्य होणार नाही’; सदावर्तेंचा थेट इशारा, ठाकरेंनाही सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.