
मुंबईत अनेक कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; संघटनेला मिळाली नवी ताकद
सातारा : पाटण तालुक्यातील अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. अणुशक्ती नगर विधानसभा अंतर्गत आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत संघटनेला नवी ताकद दिली.
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी जयवंतराव वरंडे, दत्ता डोंगळे एकनाथ बेबले, दिनेश धनवे, नामदेव वरंडे, विठ्ठल टोपले, सुभाष चव्हाण, अशोक पाडी, दिनकर पवार, संजय जाधव, नितीन तांदळे, दत्ताराम वरंडे, दत्ता वरंडे, विशाल कोळेकर, दीपक लाड, शांताराम कोळेकर, सुरेश कोळेकर, हरीश पाटील, विजय कदम यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रवेश केला.
हेदेखील वाचा : “त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा…! सामाजिक नेते बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
यावेळी लोकसभा दक्षिण मध्य मुंबई महिला संपर्क प्रमुख कामिनी शेवाळे, माजी सायन विभाग प्रमुख मंगेश सातमकर, विभाग प्रमुख अविनाश राणे, महिला विभाग प्रमुख सुनीता वैती, विधानसभा प्रमुख सचिन यादव, सहकार सेनेचे विधानसभा प्रमुख शिवाजी पवार, शाखा प्रमुख नवनाथ मतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अणुशक्तीनगर विधानसभेत शिवसेनेची ताकद वाढणार
यासाठी सहकार सेना विधानसभा प्रमुख शिवाजी पवार व शाखा समन्वयक गणेश देसाई, अरुण साळुंखे यांनी प्रयत्न केले. या प्रवेशामुळे अणुशक्तीनगर विधानसभा शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून आगामी काळात संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.
अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेते-पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांकडून पक्षबदल केले जात आहेत. असे असताना आता तासवडे विकास सेवा सोसायटीचे पॅनल प्रमुख संजय जाधव यांच्यासह चेअरमन आणि सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Phaltan Case : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सभागृहात चर्चा; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर