उद्धव ठाकरे यांनीही बंडखोर आमदार, खासदारांच्या मतदारसंघातून जनतेसमोर पक्षाची बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात अशाच सभांद्वारे ते फुटीर आमदार आणि खासदारांविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट…
अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या सहा खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे.
एका व्यक्तीवरील अतिविश्वासामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ज्या स्थितीत आणून ठेवली आहे, त्याबाबत आता फारसे बोलण्यासारखे उरलेले नाही.
ठाकरे गटातील काही खासदार अलीकडील बैठकीना अनुपस्थित राहिल्याने विविध तर्क-वितकांना उधाण आले आहे. मतदारसंघांतील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खासदार पक्षासोबतच असल्याचा संदेश देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सात खासदारांशी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात होता. खासदार संजय राऊत यांनी या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत पक्ष एकसंघ, मजबूत…
पालकमंत्री म्हणून त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच अलर्ट झाला आहे.
लाखो शिवसैनिक आणि युवासैनिकांसाठी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस हा एका उत्सवापेक्षा कमी नाही. आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'वर सकाळपासूनच शिवसैनिकांच्या लांबच लांब रांगा लागतात.
काँग्रेसमधून जे-जे बाहेर पडले आहेत, ज्यांनी पक्ष स्थापन केले आहेत, त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली यायला पाहिजे. तसेच अजित पवार गट विलीनीकरण होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये व्हा. मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी यात…
उद्धव ठाकरे लढणार असतील, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, लढणार नसतील, तर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांना समन्वयाने चर्चा करावी लागेल.
शिवसेना ठाकरे गटात मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चावर पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. काही माध्यमात त्यांना पक्षाचा कार्याध्यक्ष करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या.
सध्या शिंदे गटाकडे सात खासदार आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे सहा खासदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने तयारी केली होती.
अकोल्यात शिवसेना UBT ला मोठे खिंडार पडले असून जिल्हाध्यक्षांसह ४ नगरसेवकांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. हे सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाल्याने ठाकरेंना मोठा धक्का…
सर्वोच्च न्यायालयाकडून ते दोन्ही पक्षकारांना नंतर सांगण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. रायगडमध्ये वेगळा 'पॅटर्न' राबवण्याचे संकेत देत सत्तेच्या समीकरणात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहकार सेना विधानसभा प्रमुख शिवाजी पवार व शाखा समन्वयक गणेश देसाई, अरुण साळुंखे यांनी प्रयत्न केले. या प्रवेशामुळे अणुशक्तीनगर विधानसभा शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली.
शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण अनेक महिन्यांपासून कोर्टात प्रलंबित आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असताना आता या प्रकरणासह धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती झाल्यास हा गण शिंदे सेनेला सोडण्यात यावा व महायुती न झाल्यास देखील या गणातून आपण निवडणूक लढणारच असल्याचे शिंदे सेनेचे तालुकाप्रमुख समीर गोळे यांनी सांगत खर्शी बारामुरे गणात शड्डू…
न्यायाधीशांचे नाव सूर्यकांत आहे. किमान सूर्याचा तरी प्रकाश पडू द्या. आशेचा झारोका तुमच्या खिडकीमधून येऊन असं दाखवा. संविधानातील तरतुदीनुसार नियमानुसार कायद्यानुसार व्हावा.