Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : मनोज जरांगे पाटलांच्या भेटी वाढल्या; संजय शिरसाट यांनी घेतली भेट, सांगितले कारण

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी त्यांची भेट घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2025 | 04:32 PM
Maratha leader manoj jarange patil meet with sanjay shirsat maharashtra political news

Maratha leader manoj jarange patil meet with sanjay shirsat maharashtra political news

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये अनेक मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे. राजकीय नेत्यांच्या वाढत्या वादग्रस्त विधानांवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आणला आहे. अधिवेशनानंतर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच सत्ताधारी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचे प्रयोजन सांगितले आहे.

संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलो होतो. यावेळी त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांसंदर्भात काही प्रश्न असून, त्यावर चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचे काम सुरू नसल्याचे जरांगे यांनी लक्षात आणून दिले आहे. तसेच तीन गॅझेट बाबत नोटिफिकेशन काढले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व मुद्दे त्यांनी चर्चेमध्ये मांडले आहे.  याबाबत सोमवारी मुंबईत गेल्यावर यावर आणखी एक बैठक बोलावता येणार का याबाबत पाहतो. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यात लक्ष घालत आहे, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे संजय शिरसाट यांनी राज्यामध्ये सुरु असलेल्या गंभीर घटनांवर प्रतिक्रिया दिली. जालनामध्ये तरुणावर झालेल्या अत्याचाराबाबत संजय शिरसाट म्हणाले की, “पीडित तरुण हा दारू पिल्याचे व्हिडीओ आले आहे. हा भाग असला तरीही चटके देण्याचे भाग निंदनीय आहे, असे चटके देणे योग्य नाही. हा भयानक व्हिडीओ आहे,” असे मत त्यांनी मांडले. तसेच पुण्यामध्ये गौरव अहुजा याने भररस्त्यात केलेल्या अश्लील कृत्यावर देखील संजय शिरसाट म्हणाले की, “असे विकृत लोक समाजात असतात, जे काही सीसीटीव्ही आहे त्यावरून आरोपी पकडले जात आहेत. सरकार गंभीर आहे आणि आरोपी जेलमध्ये कसा सडेल यासाठी प्रयत्न केले जाईल. पुण्यात असे घडू नयेत दुर्देव आहे. उचभ्रू असो की कुणी असो,” असे मत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये स्थान नसल्याची टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “या मूर्ख लोकांना सांगतो कोण, तुमचं कोणी ऐकत नाही, शरद पवार यांचा आता फोनही येत नाही, काँग्रेस विचारत नाही, भास्कर जाधव विरोधीपक्ष नेते होणार नाही माहीत असून त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केले जात आहे,” असे स्पष्ट मत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Maratha leader manoj jarange patil meet with sanjay shirsat maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • Mahayuti Government
  • Manoj Jarange
  • MLA Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला
1

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला

“त्यांना रोजगार हमीचं काम…; धनंजय मुंडेंनी कामाची मागणी करताच जरांगे पाटलांचे टीकास्त्र
2

“त्यांना रोजगार हमीचं काम…; धनंजय मुंडेंनी कामाची मागणी करताच जरांगे पाटलांचे टीकास्त्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी
3

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो काळजी घ्या…! E-KYC मधील एक चूक पडू शकते महागात, थेट नाव होईल कमी

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार
4

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.