maratha leader manoj jarange patil taget Chhagan Bhujbal over reservation
Maratha Reservation : मराठवाडा : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आग्रह धरला. जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवामध्ये पाच दिवस उपोषण केले. मुंबईमध्ये त्यांनी आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केले. यानंतर जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. याबाबत जीआर देखील काढण्यात आले. यामुळे ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. आता जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे.
मराठा समाजाबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय ओबीसी नेत्यांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीला न जाता आपली नाराजी दाखवली आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना तुरुंगात पाठवा अशी अजब मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली. ते म्हणाले की, छगन भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहेत , त्यांना जेलमध्ये घाला अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. भुजबळ हे सरकार आणि फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकारला छगन भुजबळ डाग लावू शकतो
ओबीसी नेते छगन भुजबळ हे मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआर विरोधात मुंबई हाय कोर्टामध्ये धाव घेतली आहे. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, सरकारचा आणि मराठ्यांचा रोष आता कुठे कमी होतोय. भुजबळांमुळे तो वाढू नये. आणि देवेंद्र फडणवीसांना भुजबळांमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर त्यांना जेलमध्ये जाऊ दिलेलं बरं, कारण त्यांना तुम्हीच (सरकारने) बाहेर आणलं, आणि आता तुम्हालाच ते परत घातक बनणार असतील तर त्यांना पुन्हा जेलमध्ये टाका, तेच बरं. नाहीतर फडणवीस साहेबांच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लावू शकतो, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना डिवचले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हे ( भुजबळ) बिनडोक आहेत
पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कारण त्यांना इतका प्रसिद्धीची, नावाची आणि चलतीची माज आणि मस्ती आहे. सरकारचं नाही माझं ऐकायचं असं त्यांचं (भुजबळ) म्हणणं आहे. तू काय बाप लागून गेला का सगळ्यांचा, तुलाच खूप अक्कल आहे, सरकारला अक्कल नाही का? हे ( भुजबळ) बिनडोक आहेत, त्यांनी (सरकारने) त्याला सोडवून आणलं. आणि आज तेच भुजबळ सरकारसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरत आहेत,” असा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे.