मोठी बातमी! पुन्हा ठाकरे बंधू एकत्र, राज यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे 'शिवतीर्थ' वर (फोटो सौजन्य-X)
Uddhav Thackeray Raj Thackeray News In Marathi: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये सतत चर्चेचा विषय असलेले ठाकरे बंधू आज (10 सप्टेंबर) पुन्हा एकमेकांना भेटले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब यांनीही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या अचानक भेटीला गेल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे दिसते. या भेटवस्तूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि उबाठा गट एकत्र येण्याचे मानले जात आहे.
यापूर्वी उद्धव ठाकरे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले असते. यावेळी उद्ध ठाके हे पहिल्यांदाच शिवतीर्थवर गेले होते. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे त्यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या घरी बनवलेले जेवणाचा आस्वादही घेतला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
राजकीय दृष्टिकोनातून ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. आता खऱ्या अर्थाने दोन राजकीय पक्ष एकत्र येणाच्या दृष्टीने चर्चा सुरू होऊ शकते.
मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी अवघा तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत, सर्व राजकीय पक्षांनी आपापली तयारी कसून सुरुल केली. महायुती असो किंवा महाविकास आघाडी अंतर्गत पक्ष असोत, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि नगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सविस्तर चर्चा केली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येणार आहेत, अशी अशी स्पष्ट कल्पना उद्धव यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिली अशी माहिती समोर आली.
आज उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. दोन्ही भाऊ अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. फक्त आज त्यांची बैठक कौटुंबिक बैठक नव्हती तर राजकीय बैठक होती, अशी राजकारणात चर्चा रंगली आहे. या बैठकीत कोणती चर्चा झाली आहे, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.