maratha leader manoj jarange patil target obc chhagan bhujbal over reservation
बीड : सर्वत्र दिवाळी सणाचा मोठा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने दिव्याची आरास आणि आतिषबाजी केली जात आहे. राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या उसाहामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. त्याचबरोबर विरोधकांच्या टीका टिप्पणी देखील सुरु आहे. आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ म्हणजे ठुसका फटाका असल्याचे म्हणत टीकास्त्र डागले.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जरांगे पाटील म्हणाले की, सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या. सरकारचे धोरणच असं आहे की तात्पुरत आनंद द्यायचा. अशी चाल जाणून बुजून सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. एक तर सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजण शेतकऱ्यांचं काहीच होत नाही, फक्त तात्पुरता आनंद द्यायचा. तात्पुरता आनंद म्हणजे त्याचा अर्थ फसवणूक असा होतो. याला खच्चीकरण करण्याचं काम म्हणतात, त्यामुळे हे सरकार तात्पुरता आनंद सत्तेमध्ये आल्यापासून देत असल्याचाही जरंगे पाटील यांनी म्हटलं.फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, त्याला प्रत्यक्ष मदत पाहिजे, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “दीपावली आणि पाडव्याचे दोन-तीन दिवस जाऊ द्या त्यानंतर शेतकरी तज्ञ अभ्यासक यांना आम्ही फोन करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी कशा स्वरूपाने पुढे जायचं यासाठी कर्जमुक्तीसाठी नुकसान भरपाई पैसे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात काय करायचं. त्यासाठी सगळ्या पक्षात असलेले सुद्धा आम्ही बोलवणार आहोत. सध्या शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाल्याने वाईट दिवाळी आलेली आहे, त्यामुळे कशीतरी आता करावी लागणार आहे,” असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले
मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बननराव तायवाड यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मी बबनराव तायवाडे यांच्यावर आतापर्यंत बोललोच नाही, परंतु त्या माणसाची आता मला कीव यायला लागलेली आहे कारण की तुम्हाला आता ते इतके घाण घाण बोलू लागले आहेत तरीपण तुम्ही तिकडचे वाटता असा देखील हल्लाबोल जरांगे पाटलांनी बबनराव तायवाडे यांच्यावर केला. मला आत्ता सात आठ दिवसापूर्वी माहीत झाला की ते कुणबी आहेत म्हणून त्यामुळे कुणबी मराठा एकच आहे. तुम्हाला किती घाण बोलतात ते असल्या लोकांना लाथा खाली तुडून काढलं पाहिजे असा सल्ला देखील जरांगे यांनी बबनराव तायवाडे यांना दिला.तुम्हाला या वयात किती घाण घाण बोलत आहे तुम्ही त्यांना लाथाने ठोकलं पाहिजे. ज्याला कुत्रही विचारत नाही त्यांचे बोलणे तुम्ही खायला लागलात असं म्हणत नाव न घेता ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “तो जी आर रद्द व्हायची कुणाचीही टप्पर नाही, तो आता कधीपर्यंत सुद्धा राहणार आहे. मराठवाड्यातले मराठी आरक्षणामध्ये जाणार, परंतु छगन भुजबळ त्यांना नादी लावत आहेत. ते भेदभाव पसरवत आहेत. बीडची इतकुशिक सभा एवढं त्याला महाएल्गार नाव दिलं. त्या ग्राउंडवर आमची घोंगडी बैठक झालेली आहे आणि आम्हाला उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, असा टोलाही त्यांनी भुजबळांना लगावला. भुजबळांना कोणत्याच फटाक्याची उपास चालत नाही ते ठुसकी आहेत. छगन भुजबळ हे घुरट आणि ठुसका फटाका आहेत,” असा टोला जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.