Maratha Manoj Jarange Patil new ultimatum to Mahayuti government for reservation Kunbi certificate
Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केले. ओबीसी आरक्षणाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नव्या तारखेचा अल्टिमेटम दिला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवामध्ये चलो मुंबईचा नारा दिला. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केले. मुंबई हाय कोर्ट आणि सरकारच्या हस्तक्षेपानंतर जरांगे पाटील यांचे उपोषण थांबले. कुणबी प्रमाणपत्राबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जरांगे पाटील यांनी सरकारला नवीन अल्टीमेटम दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच उपसमितीला सांगतो की, 17 सप्टेंबरच्या आता गॅझेटनुसार मराठवाडामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र द्या. मंगळावर किंवा बुधवारी कॅबिनेट घ्या. सरकारने कुठलाही बदल करू नये, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत नवा अल्टिमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गावागावातील समिती कामाला लावा. 17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्यावा नसता मला मोठा निर्णय घ्यावा लागेल. कुणाचे एकूण आमची हेळसांड होऊ देऊ नका. मराठ्यांच्या मुलांनी जीआर काढला, मराठ्यांच्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धा महाराष्ट्र आणि अभ्यासक पागल झाला. मराठवाडा 100 टक्के आरक्षणमध्ये जाणार. आनंद झाला पण थोडे धीर धरावा. सर्वांनी संयम ठेवावा, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी नवी तारीख राज्य सरकारसाठी दिली आहे.
आता मराठ्यांचा अपमान करू नका…
दसऱ्याच्या निमित्ताने मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेत असतात. यामध्ये आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल असा देखील इशारा दिला आहे. गॅझेटची तात्काळ भूमिका जाहीर नाही केली तर आम्हाला दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल. आता मराठ्यांचा अपमान करू नका. आपला विजय झाला पण खुप जणांना पचत नाही. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबाद गॅझेट नोंदी नुसार प्रमाणपत्र द्या. जीआरनुसार नोंदी आणि त्यानुसार प्रमाणपत्र द्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगतो, अशा कडक शब्दांत जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये अनेकदा वाद निर्माण झालेले दिसून आले आहेत. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री भुजबळांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, येवला वाल्याचे ऐकू नका. तुम्ही आमच्या मागे लागले आता आम्ही तुमच्या मागे लागू. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे. वेळ आल्यावर जशाच तसे बघू. आम्हाला चॅलेंज केले तर, मी 1994 चा जीआर रद्द करेल. आम्ही कुणावर हल्ला केला नाही, गुन्हे वापस घेतले जातील. 17 सप्टेंबर च्या आत मराठवाड्यात मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र दिसले पाहिजे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.