उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावतींच्या 'बसपा'ची जोरदार तयारी; 2027 मध्ये सत्तेत 'कमबॅक' करणार?
लखनौ : उत्तर प्रदेशात सध्या भाजपचे सरकार सत्तेवर आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदावर आहेत. असे असताना उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीस अजून दीड वर्षाचा कालावधी असाला तरी बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी लखनौमध्ये मोठा शक्तिप्रदर्शन करत २०२७ साठी तयारी सुरु असल्याचे स्पष्ट केले.
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित महारॅलीत त्यांनी २००७ प्रमाणे सामाजिक आणि राजकीय समीकरण तयार करून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची भूमिका मांडली. मायावतींनी आपल्या भाषणात दलित, अति-मागास, ओबीसी, ब्राह्मण आणि क्षत्रिय समाजाला एकत्र आणण्यावर भर दिला. ब्राह्मणांना जोडण्याची जबाबदारी सतीश चंद्र मिश्र यांना, क्षत्रियांसाठी उमाशंकर सिंह यांना, तर अति मागाससाठी प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : ‘महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?’; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल
२००७ मध्ये बसपाने दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण यांचे युती करून स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्या विजयाचे पुनरावलोकन करत मायावतींनी सर्वजन संकल्पनेवर भर देत नव्या सोशल इंजिनीयरिंगची घोषणा केली.
रामजी गौतम यांच्यावरील जबाबदारी वाढवली
काही दिवसांपूर्वी, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची काही दिवसांपूर्वी समन्वयकपदी नियुक्ती केली होती. आकाश आनंद यांना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मायावती यांनी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांच्यावरील जबाबदारी वाढवली आहे.
हेदेखील वाचा : Raj Thackeray and Uddhav Meet: ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…