Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: माजी खासदारांच्या गावात राजकीय भूंकप! चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांचा अचानक राजीनामा

सांगलीतील चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांनी अचानक राजीनामा दिला आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्या गावात घडलेल्या या राजकीय बदलामुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 08:56 PM
गावच्या राजकारणात मोठा भूकंप! (Photo Credit- AI)

गावच्या राजकारणात मोठा भूकंप! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

 

  • गावच्या राजकारणात मोठा भूकंप!
  • माजी खासदारांच्या गावात सरपंचाचा तडकाफडकी राजीनामा
  • नेमक कारण काय?
तासगाव : सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांच्या गावातच राजकीय घडामोडींना अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने गावाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक अविनाश पाटील यांच्याकडे लेखी राजीनामा सादर केला असून त्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

चिंचणी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०२२-२३ मध्ये पार पडली होती. त्या वेळी थेट लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत सदाशिव माळी हे बिनविरोध निवडून आले होते. माजी खासदार संजय पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. दोन्ही गटांच्या सहमतीनेच माळी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली होती.

गेल्या सव्वातीन वर्षांपासून माळी यांनी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत विविध विकासकामे राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकाळाला अजून दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने गावात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बिनविरोध निवडणुकीतून सत्तेवर आलेल्या नेतृत्वानेच मध्यंतरात पदाचा राजीनामा दिल्याने गावातील राजकीय समीकरणे पुन्हा हलू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Sangali News: तासगावच्या द्राक्ष संशोधन केंद्राकडे दुर्लक्ष का? सांगलीच्या आमदारांचा लक्षवेधीद्वारे सरकारला सवाल

विशेष म्हणजे चिंचणी हे माजी खासदार संजय पाटील यांचे गाव असल्यामुळे येथील ग्रामपंचायतीतील प्रत्येक राजकीय हालचालीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे सरपंचाचा अचानक झालेला राजीनामा हा केवळ वैयक्तिक निर्णय आहे की गावातील राजकीय समीकरणांतील नव्या घडामोडींचा संकेत, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता व्यक्त होत आहे.

आता रिक्त होणाऱ्या सरपंचपदावर कोणाला संधी मिळणार, कोणता गट पुढे सरसावणार आणि गावातील पुढील राजकीय पटावर कोणते नवे समीकरण उभे राहणार, याकडे ग्रामस्थांसह तालुक्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माळी यांनी तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक अविनाश पाटील यांच्याकडे लेखी राजीनामा सादर केला असून त्याबाबतची पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक कारणामुळे निर्णय : सदाशिव माळी

“ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सव्वातीन वर्षे झाली. या काळात गावाच्या विकासासाठी शक्य तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे सरपंच पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.”

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Web Title: Sangli chinchani sarpanch sadashiv mali resigns former mp village politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • political news
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न
3

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर
4

सांगली शिक्षक बँकेची ७४ वी वार्षिक सभा रविवारी; ५ टक्के लाभांशाची घोषणा, कर्जमर्यादा २० लाखांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.