Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; आता ओडिशात…

पक्षाने आता १६ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी ओडिशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. एक प्रभावी चेहरा म्हणून बावनकुळे यांच्याकडे बघितले जाते. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2026 | 08:50 AM
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी; आता ओडिशात...

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी; आता ओडिशात...

Follow Us
Follow Us:

मुंबई : चार वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या गोरखपूर क्षेत्राची जबाबदारी सांभाळणारे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपने ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे पक्षाने जाहीर केले.

प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा निवडून आणल्या. सद्यस्थितीत राज्यात ते भाजपचे क्रमांक २ चे नेते गणले जातात. पक्षाने आता १६ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी ओडिशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. एक प्रभावी चेहरा म्हणून बावनकुळे यांच्याकडे बघितले जाते. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले होते. त्यामुळे त्यांचा संघटना व सरकारमध्ये दबदबा वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांनी घवघवीत यश मिळवले.

दरम्यान, या निवडीनंतर बावनकुळे यांनी पंतप्रधानांसह अनेकांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व शिस्त पाळत पार पाडू, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी दाखल झालेल्या अर्जामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 7 जागांसाठी नेमके सातच अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज राहिलेली नाही. बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे.

हेदेखील वाचा : Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

विनोद तावडेंनाही राज्यसभेसाठी संधी

भाजपकडून 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना विशेष परिस्थितीही पाहायला मिळाली. तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

Web Title: Chandrashekhar bawankule get responsibilities of odisha observer rajya sabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
1

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका
2

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
3

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण
4

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.