Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आपल्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिशा सालियन प्रकरणाचा दाखला दिला. ‘दिशा सालियनही कोणाची तरी मुलगी होती, तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली होती का?’ असा सवाल त्यांनी संजय राऊतांना केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 02, 2026 | 01:23 PM
'आदित्य ठाकरेला अटक...', दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

'आदित्य ठाकरेला अटक...', दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • ‘दिशा सालियनही कोणाची तरी मुलगी होती’
  • मीनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांना सवाल
  • आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी
Pradeep Purnekar Case : ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करून निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले जातं आहे. (Pradeep Purnekar Case)

याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यामुळे ठाण्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आपल्यावर आणि आपल्या पतीवर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी 2 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

‘पुरावा नसताना माझ्यावर आरोप’

ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी 2 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत पूर्णेकर हे आरोप फेटाळले आहेत. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर या घटनेचे राजकारण केल्याचा आरोप केला. कोणताही पुरावा नसताना आपल्यावर आरोप करून या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे गटाशी संबंधित असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

पूर्णेकर हत्या प्रकरणात कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पप्या शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पूर्णेकर यांच्या नातेवाईकांनी मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर संशय व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती.

दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख

पत्रकार परिषदेत मीनाक्षी शिंदे यांनी दिशा सालियन प्रकरणाचाही उल्लेख करत संजय राऊत यांना सवाल केला. त्यांनी दिशा सालियन प्रकरणातील आरोपांचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली. “दिशा सालियन प्रकरणात तिचे वडिल सहावर्ष पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते. त्या एफआयआरमध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरेंच नाव आहे. संजय राऊतला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, ती पण कोणाची तरी मुलगी होती. अशावेळी तुम्ही आदित्य ठाकरेला अटक करा अशी मागणी केली का?” असा सवाल मिनाक्षी शिंदे यांनी विचारला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, असं मिनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे.

‘उद्या विमान हायजॅक झाले तरी माझे नाव घेणार का?’

आपल्यावरील आरोप फेटाळताना मीनाक्षी शिंदे यांनी, कोणत्याही आरोपासाठी पुरावा आवश्यक असल्याचे सांगितले. आपला संबंध नसलेल्या प्रकरणात नाव जोडले जात आहे. उद्या विमान हायजॅक झाले तरी त्यामागे मीनाक्षी शिंदे असल्याचे म्हटले जाईल का, असा सवाल केला. पोलीस तपासातून दोषी कोण आहे हे स्पष्ट होईल आणि आपण चौकशीला पूर्ण सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले.

कथित ऑडिओ क्लिपवरून वाद

या प्रकरणात संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक कथित ऑडिओ क्लिप शेअर करून ती मीनाक्षी शिंदे यांची असल्याचा दावा केला होता. त्या क्लिपच्या आधारे त्यांनी शिंदे यांच्यावर आरोप केले. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हा दावा फेटाळला असून संबंधित ऑडिओ क्लिप AI-जनरेटेड आहे.

आरोपींसोबतच्या फोटोवरही स्पष्टीकरण

आरोपींसोबत फोटो असल्याच्या मुद्द्यावर मीनाक्षी शिंदे यांनी आपण याच प्रभागात जन्मलो असून आपले आणि आपल्या पतीचे परिसरातील अनेक नागरिकांशी संबंध असल्याचे सांगितले. एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे म्हणजे गुन्ह्यात सहभागाचा पुरावा ठरत नाही. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्यामुळे विविध राजकीय नेते आणि संबंधित व्यक्तींकडून करण्यात येणारे आरोप हे तपासातील सिद्ध निष्कर्षांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Web Title: Meenakshi shinde demands aaditya thackeray arrest in disha salian case questions sanjay raut sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • Meenakshi Shinde
  • Pradeep Purnekar

संबंधित बातम्या

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
1

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
2

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप
3

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.