सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचा आका विनायक राऊत की वैभव नाईक?; मंत्री नितेश राणे यांचं विधान
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधान केले आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार पारदर्शक आहे. कोणाचीही गय करणार नाही. तुम्हाला कोणाचे राजकीय हिशेब चुकते करायचे आहेत ते करा. मात्र, जिल्ह्याची बदनामी करू नका. आका शोधण्याची मोहीम चालवली आहे, किती आका काढताय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आका विनायक राऊत की वैभव नाईक? याचं उत्तर द्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शक्तिपीठ महामार्गावरही नितेश राणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्गासंदर्भात आम्ही प्रत्येक गावाला भेट देणार आणि ग्रामस्थांची चर्चा करणार आहोत. ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू न करण्याच्या संबंधित प्रशासनाला नारायण राणे यांच्या स्पष्ट सूचना आहेत. आम्हाला विकास हवाय, प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करणार आहोत. कुणीही बाधित होत नाही, असा पर्यायी महामार्ग शोधण्याच्या संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या आहेत’.
दरम्यान, या शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकार पातळीवर सुद्धा कोणते, काही निश्चित झालेले नाही. हायवेच काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. चिपी विमानतळाचेही नाईट लँडिंगचे काम सुरू आहे. विरोधकांनी जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम करू नये. वातावरण खराब करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. विरोधकांच्या सूचना असतील तर त्यांनी त्या माझ्याकडे मांडाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
कासारडे मायनिंगसंदर्भात ग्रामस्थ आमच्यासोबत
कासारडे मायनिंगसंदर्भात ग्रामस्थ आमच्यासोबत आहेत. मायनिंगसंदर्भात तक्रारी असतील तर आमच्याकडे तक्रार करा. कारवाईची भूमिका प्रशासनाची राहील. जिल्ह्यातील मायनिंग, अंमली पदार्थाविरोधात कोणतीही तक्रार असेल त्या गोष्टीला जिल्ह्यात थारा नाही. तुम्ही पुरावे द्या, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी माझी, असेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: शिंदेंची खेळी अन् शरद पवारांना दणका; 6 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश