uday samant on eknath shinde delhi tour
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बाब राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद आहे. यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून सर्वांना याबद्दल आभार मानले आहे. दरम्यान, यावर आता मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल देखील त्यांनी अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळतो याचा आनंद आहे. याबद्दल केंद्र सरकारचे देखील आभारी आहोत. कोकणातील चार किल्ले जागतिक वारसा स्थळात आले आहेत. शिवाजी महाराजांचा वारसा जपणारे हे किल्ले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत देखील मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जागतिक दर्जाचा स्मारक बनवण्यासाठी त्याला मुहूर्त स्वरूप येत आहे. येत्या काही दिवसात स्मारकाचं काम सुरू होईल. याचा प्रेसेंटेशन उद्या होणार आहे. छत्रपती संभाजी स्मारकाच्या स्मारकाला मुहूर्त स्वरूप आलं आहे. निविदा फायनल होऊन त्याचं काम सुरू होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
महाराष्ट्राला सुरक्षित करणारे हे विधेयक
राज्याच्या विधीमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विधान सभेमध्ये जन सुरक्षा विधेयक मंजूर झाले आहे. यावर विरोधकांकडून कोणत्याही सूचना न येता हे विधेयक मंजूर झाले आहे. मात्र यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त करत हे चांगले नसल्याचे म्हटले आहे. यावर उदय सामंत म्हणाले की, प्रत्येक चांगली गोष्ट वाईट दिसते. अशापैकी लोक याला विरोध करत आहेत. महाराष्ट्राला सुरक्षित करणारे हे विधेयक आहे. महाराष्ट्र सुरक्षित ठेवणाऱ्या बिलाला देखील हे विरोधक विरोध करतात, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, “जे आरोप करत आहेत त्यांना जनतेने जागा दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांना सल्ला द्यायची आवश्यकता नाही. शिंदे दिल्लीला का गेले हे पक्षाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्या दिवशी गेले त्या दिवशी अमित शाह देखील त्या ठिकाणी नव्हते. जे घडलं नाही ते घडलं म्हणून सांगणं चुकीचं आहे. जे लोक खोटं बोलतात त्यांची जागा त्यांना दिसली आहे,” असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.