Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवशी ‘बॅनरलेस’ वातावरण; स्थानिक पातळीवरील नाराजी की संघटनात्मक कमकुवतपणा?

मीरा-भाईंदर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा-भाईंदर शहरात पूर्णपणे ‘बॅनरलेस’ वातावरण पाहायला मिळाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2026 | 05:36 PM
Mira Bhayander : खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवशी ‘बॅनरलेस’ वातावरण; स्थानिक पातळीवरील नाराजी की संघटनात्मक कमकुवतपणा?
Follow Us
Follow Us:
  • खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवशी ‘बॅनरलेस’ वातावरण
  • स्थानिक पातळीवरील नाराजी की संघटनात्मक कमकुवतपणा?
भाईंदर/विजय काते : राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचे फलक, बॅनर्स आणि शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणे ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र, मीरा-भाईंदर आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा-भाईंदर शहरात पूर्णपणे ‘बॅनरलेस’ वातावरण पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये एकही शुभेच्छा फलक झळकला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नरेश मस्के यांचा मीरा-भाईंदरमधील वावर अत्यंत मर्यादित राहिल्याची चर्चा स्थानिक नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. अनेक सामाजिक, पायाभूत आणि स्थानिक प्रश्नांवर खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठपुरावा केल्याचे उदाहरण फारसे समोर आले नसल्याचेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जनतेशी थेट संपर्क कमी असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे जाणकार सांगतात. यासोबतच, शहरात खासदारांचे स्वतंत्र कार्यालय नसणे हा मुद्दाही वारंवार पुढे येत आहे.

Maharashtra Politics : देगलूरमध्ये राजकीय उलथापालथ; अजितदादांच्या अकाली निधनामुळे कार्यकर्ते निराधार

स्थानिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ठोस व्यासपीठ उपलब्ध नसल्याने नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये दिसणाऱ्या उत्साहावर झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मीरा-भाईंदरमधील 146 विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा प्रभाव आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या भागात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत, खासदारांच्या वाढदिवशी एकही बॅनर झळकला नाही, ही बाब अधिकच लक्षवेधी ठरली आहे. सामान्यतः अशा प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर फलक लावून आपली निष्ठा आणि ताकद दर्शवतात. मात्र यंदा पूर्णपणे शांतता दिसल्याने गटबाजी, अंतर्गत नाराजी किंवा समन्वयाचा अभाव असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

काही जाणकारांच्या मते, स्थानिक पातळीवरील नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव, कार्यकर्त्यांमध्ये संवादाची कमतरता किंवा आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर घेतलेली सावध भूमिका यामागे असू शकते. तर दुसरीकडे, काहीजण हेही मान्य करतात की, अलीकडील काळात प्रशासनाकडून बॅनरबाजीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचाही यावर परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अशा निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही इतर नेत्यांच्या वाढदिवशी शहरात फलक झळकताना दिसतात, ही बाब या प्रकरणात अधिक प्रश्न निर्माण करते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर खासदार नरेश मस्के किंवा त्यांच्या अधिकृत कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यांच्या समर्थकांकडूनही मौन पाळले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात दिसलेली ही ‘शांतता’ नेमकी कोणत्या राजकीय संकेतांकडे निर्देश करते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.एकूणच, मीरा-भाईंदरमध्ये खासदारांच्या वाढदिवसानिमित्त दिसलेले ‘बॅनरलेस’ वातावरण हे केवळ योगायोग आहे की स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची नांदी, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Satara Politics: मराठा आरक्षण लाठीमार ते सातारा राडा! कोण आहेत आयपीएस तुषार दोशी?

Web Title: Mira bhayander banners were not displayed on mp naresh maskes birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Mira Bhayander municipal elections
  • Naresh Mhaske
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.