देगलूरमध्ये राजकीय वाद अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची दुराव्यस्था झाली (फोटो - सोशल मीडिया)
प्रा. निवृत्ती भागवत : देगलूर : देगलूर तालुक्यात सध्या राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक घडामोडींमुळे विविध प्रश्न ऐरणीवर आले आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांंच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असलेले कार्यकर्ते सध्या निराधार झाल्याचे चित्र आहे. अनेक कार्यकर्ते नव्या राजकीय आधाराच्या शोधात असून, त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शिवसेना शिंदे गटाने या परिस्थितीचा फायदा घेत मोर्चेबांधणी सुरू केली असून, काही कार्यकत्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : मराठा आरक्षण लाठीमार ते सातारा राडा! कोण आहेत आयपीएस तुषार दोशी?
दरम्यान, देगलूरमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेली बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली. भदंत करूनानंद महाघेरो यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या परिषदेत बौद्ध तत्त्वज्ञान, समता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. रमजान इंदही तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभावाचा संदेश दिला. घराघरांत शिरखुम्यांसह पारंपरिक पदाथांची मेजवानी रंगली. याचबरोबर, तालुक्यात गुटखा विक्री पुन्हा वाढत असल्याचे प्रशासनाच्या कारवाया दिखाव्यापुरत्याच मर्यादित राहत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी पोलीस व आरोपी यांच्यातील सैल संबंधांच्या चर्चेमुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत आला आहे.
हे देखील वाचा : सातारा प्रकरण टाकणार महायुतीत मिठाचा खडा? मध्यरात्री DCM शिंदेंनी गाठले वर्षा निवासस्थान
पाऊस, वीज, गॅस; तिहेरी संकट
कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी होत आहे. नैसर्गिक आपत्तींनीही तालुक्याला फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वीज कोसळून एका युवतीचा मृत्यू झाला, तसेच काही पशुधनाचाही बळी गेला. सुडगी येथे लोम्बकळणाऱ्या विजेच्या तारेमुळे एका सालगड्याचा मृत्यू झाल्याने वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संतप्त नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, खाडीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष पुरवठा सुरळीत असतानाही कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत, देगलूर तालुक्यात राजकीय अनिश्चितता, प्रशासनावरील प्रश्नचिन्हे आणि नैसर्गिक संकटे यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनली असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.






