Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde Murder : आमदार धनंजय मुंडेंची होणार होती हत्या? आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Dhananjay Munde Murder : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 02, 2025 | 05:43 PM
MLA Ratnakar Gutte claims attempt to murder NCP MLA Dhananjay Munde political news

MLA Ratnakar Gutte claims attempt to murder NCP MLA Dhananjay Munde political news

Follow Us
Close
Follow Us:
  • आमदार धनंजय मुंडेंच्या खूनाचा प्रयत्न
  • गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा दावा
  • धनंजय मुंडे यांचा इंदोर मध्ये मर्डर करण्याचा प्रयत्न
Dhananjay Munde Murder : बीड : मागील अनेक दिवसांपासून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे चर्चेमध्ये आले आहेत. बीडमधून त्यांच्याविरोधात आवाज उठवण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देखील सोडावे लागले. यानंतर आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांनी अनेक महिन्यांनंतर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता आमदार धनंजय मुंडेंच्या हत्येचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या या विधनामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचा इंदोर मध्ये खून होणार होता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांच्यामुळे ते वाचले असं त्यांनी भाषणात म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच गदारोळ झाला आहे. यावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रचार केला. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी गंगाखेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर कडाडून टीका केली होती. आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर सोळाशे कोटी रुपयांचे कर्ज उचलले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांना केला होता. याला आता आमदार गुट्टे यांनी उत्तर दिले आहे. मात्र यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा खून होणार असल्याचा गंभीर आरोप केला.

हे देखील वाचा: ‘मुंबई महापालिका मतदार यादीत मोठा गोंधळ; पुरावे दाखवत आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

प्रचारसभेतील भाषणामध्ये बोलताना आमदार गुट्टे म्हणाले की, “तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली त्यांच्यासाठी किती ताकद लावली हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, की मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो. मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनू भाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा गट्टे यांनी दिला.

तुम्ही देवस्थानच्या जमिनी खाल्ल्या – गुट्टे

पुढे ते म्हणाले की, “धनू भाऊ मागील काही वर्षात तुमच्यावर बरेच आरोप झाले, प्रत्येकजण तुमच्या विरोधात बोलत होता. पण मी कधीच तुमच्या विरोधात एकही शब्द काढला नाही पण तुम्ही आता स्वतःहून गंगाखेडला आलात आणि माझ्या विरोधात बोललात त्यामुळे आता मी तुमच्या विरोधात बोलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं सर्वच बाहेर काढणार आहे. जगमित्र साखर कारखान्यासाठी तुम्ही शेअर्सच्या रूपाने गोळा केलेले पैसे काय केले तुम्ही देवस्थानच्या जमिनी खाल्ल्या,” असे म्हणत रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना सवाल केला आहे.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदे असुरक्षित, त्यांची पायमुळं उखडून काढण्याचा प्रयत्न; सुषमा अंधारेंनी दाबली महायुतीची दुखणी नस

त्याचबरोबर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांचा खून होणार असल्याचा गंभीर दावा केला. याबाबत गुट्टे म्हणाले की, ‘धनंजय मुंडे तुमचा इंदोर मध्ये मर्डर झाला असता पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं तुम्ही कोणत्या हॉटेलवर होते याची देखील मला माहिती आहे पण मी सगळेच आता काढणार नाही” असे आमदार गट्टे म्हणाले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये सर्वांनी मोठे आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच चर्चांना उधाण आले. गुट्टे यांच्या दाव्यावर आता आमदार धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देणार याची सर्वांना प्रतिक्षा लागली आहे.

Web Title: Mla ratnakar gutte claims attempt to murder ncp mla dhananjay munde political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 05:42 PM

Topics:  

  • Beed Politics
  • dhananjay munde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 2 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra Nagarparishad Voting Live:  3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, या दिवशी लागणार निकाल
2

Maharashtra Nagarparishad Voting Live: 3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, या दिवशी लागणार निकाल

राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद
3

राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद

Sanjay Raut News : शिंदे सेनेचा कोथळा हा अमित शाहांचं काढणार अन् 35 आमदार फोडणार..; संजय राऊतांचा दावा
4

Sanjay Raut News : शिंदे सेनेचा कोथळा हा अमित शाहांचं काढणार अन् 35 आमदार फोडणार..; संजय राऊतांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.