Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics- भारताची परिस्थिती देखील संवेदनशील मानली जात आहे कारण सध्या देशात फक्त २५ दिवसांचा कच्चा तेलाचा साठा आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सारख्या इंधनांचा साठा देखील मर्यादित असल्याचे वृत्त आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 05, 2026 | 06:59 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

 युद्धाच्या संकटात भारताला मोठा दिलासा

  अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. या हल्लयांमुळे या तीनही देशांत परिस्थिती अस्थिर झाली आहे. आता या संघर्षाचा परिणाम भारतावरही होत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या लष्करी तणावामुळे, तेल पुरवठ्यात संकट येण्याची चिन्हे आहेत. भारताकडे सध्या फक्त 25 दिवसांचा कच्चा तेलाचा साठा आहे. त्यामुळे येत्या काळात इंधन तुटवडा होणार असल्याची चिन्हे असतानाच रशियाने भारताला मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 05 Mar 2026 06:59 PM (IST)

    05 Mar 2026 06:59 PM (IST)

    Sant Tukaram Maharaj: देहूत उसळला भक्तांचा जनसागर; ३७८ वा वैकुंठगमन सोहळा भक्तीरसात संपन्न

    देहूगाव: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३७८ व्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याचा गुरुवारी लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात समारोप झाला. लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत दाखल झाल्याने सर्वत्र भक्तांचा जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  • 05 Mar 2026 06:53 PM (IST)

    05 Mar 2026 06:53 PM (IST)

    ENG vs ENG Semi Final Live: नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे; भारत करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

    India National Cricket Team vs England Cricket Team: २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामन्यात आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) आमनेसामने आले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन फायनलचे तिकिट बुक केले आहे. आज जो सामना जिंकले तो फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. दरम्यान, इंग्लडंने टाॅस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 05 Mar 2026 06:37 PM (IST)

    05 Mar 2026 06:37 PM (IST)

    इस्त्रायलचा बाजार उठणार

    Nuclear War: मिडल ईस्टमध्ये युद्धाचे स्वरूप वाढले आहे. इस्त्रायल, अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले केले. इराणच्या सर्वोच्च नेत्याला इस्त्रायलने ठार केले. त्यानंतर इराण चवताळला आहे. इराणने देखील चोख प्रत्युत्तर या हल्ल्याला दिले आहे. कुवेत, कतार, दुबई आशा अनेक देशांमध्ये इराणने हल्ले केले. आता इराणने आक्रमक धोरण स्वीकारले असल्याचे समोर येत आहे. इराणने अणुहॉल धमकी दिल्याचे म्हटले जात आहे.

  • 05 Mar 2026 06:25 PM (IST)

    05 Mar 2026 06:25 PM (IST)

    Bombay High Court: “धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य…”, मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    Bombay High Court News in Marathi: मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विमानतळाजवळ नमाज अदा करण्यावरून एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. रमजान महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील तात्पुरत्या शेडमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी मागणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा चालकांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयाने म्हटले की धर्मापेक्षा सुरक्षितता प्राधान्य देते.

  • 05 Mar 2026 06:06 PM (IST)

    05 Mar 2026 06:06 PM (IST)

    Amazon Electronic Premier League 2026: स्वस्तात इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याची सुवर्णसंधी! स्मार्टफोनवर मिळणार भारी डिस्काउंट

    Amazon Sale Offers News In Marathi: तुम्हाला आता स्वस्तात मस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू सुवर्णसंधी घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक अॅक्सेसरीज खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी असेल. अमेझॉन सेल २०२६ दरम्यान, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, हेडफोन, कॅमेरा, इअरबड्स, एसी, स्मार्ट टीव्ही आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या उत्पादनांवर उत्तम डील उपलब्ध असतील. अमेझॉन सेल २०२६ आज, ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजता म्हणजेच ६ मार्च रोजी सुरू होत आहे. ६ मार्च रोजी सुरू झालेला हा सेल १२ मार्चपर्यंत लाईव्ह राहील.

  • 05 Mar 2026 06:00 PM (IST)

    05 Mar 2026 06:00 PM (IST)

    Iran Israel War: इस्त्रायलचा बाजार उठणार; ‘हा’ प्रयत्न केल्यास…; इराणने दिली थेट धमकी

    Nuclear War: मिडल ईस्टमध्ये युद्धाचे स्वरूप वाढले आहे. इस्त्रायल, अमेरिकेने इराणवर भीषण हल्ले केले. इराणच्या सर्वोच्च नेत्याला इस्त्रायलने ठार केले. त्यानंतर इराण चवताळला आहे. इराणने देखील चोख प्रत्युत्तर या हल्ल्याला दिले आहे. कुवेत, कतार, दुबई आशा अनेक देशांमध्ये इराणने हल्ले केले. आता इराणने आक्रमक धोरण स्वीकारले असल्याचे समोर येत आहे. इराणने अणुहॉल धमकी दिल्याचे म्हटले जात आहे.

  • 05 Mar 2026 05:44 PM (IST)

    05 Mar 2026 05:44 PM (IST)

    Toxic ने बदलली रिलीज डेट

    “टॉक्सिक” हा चित्रपट मूळतः १९ मार्च रोजी “धुरंधर २” सोबत प्रदर्शित होणार होता. यशने आता त्याच्या इंस्टाग्रामवर एक अधिकृत पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल एक नवीन अपडेट देण्यात आली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट ४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तो कन्नड आणि इंग्रजीमध्ये देखील प्रदर्शित होईल.

  • 05 Mar 2026 05:36 PM (IST)

    05 Mar 2026 05:36 PM (IST)

    भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प

    पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धसंघर्षांदरम्यान वीज प्रकल्पांवर हल्ल्यांनंतर कतारने द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) उत्पादन थांबवले आहे. यामुळे भारताच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. प्रमुख देशांतर्गत क्षेत्रांसाठी इंधन उपलब्धतेत संकट निर्माण झाले आहे. भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजांच्या कतारसोबतच्या दीर्घकालीन एलएनजी करारांवर अवलंबून आहे. कतारमधून शिपमेंटमध्ये तात्पुरती स्थगिती आल्यामुळे औद्योगिक ग्राहक आणि शहरी वायू वितरण (सीजीडी) कंपन्यांसाठी ४० टक्क्यांपर्यंत पुरवठा कपात झाली आहे. काही औद्योगिक युनिट्स पर्यायी इंधनांकडे वळू शकतात, तर सीएनजी विकणाऱ्या शहरी वायू क्षेत्राने गंभीर संकटाचा धोका निर्माण झाला आहे.

  • 05 Mar 2026 04:50 PM (IST)

    05 Mar 2026 04:50 PM (IST)

    ई-चलन विरोधात वाहतूकदार संघटनांचे चक्काजाम आंदोलन

    ई-चलन प्रणालीच्या विरोधात नवी मुंबईतील वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात वाहतूकदारांनी रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत ई-चलन प्रणालीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • 05 Mar 2026 04:45 PM (IST)

    05 Mar 2026 04:45 PM (IST)

    नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन नाही ?

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सभापतींना बसायला स्वतंत्र केबिन नसल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. परिवहन सभापतींसाठी केबिनची व्यवस्था न केल्यास त्यांना थेट आयुक्तांच्या खुर्चीवर बसवू असा इशारा त्यांनी दिला आहे.

  • 05 Mar 2026 04:40 PM (IST)

    05 Mar 2026 04:40 PM (IST)

    कुडाळ तेर्सेबांबर्डे येथे सहा फुटी मगर जेरबंद; ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास

    कुडाळ तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे सहाफुटी मगरीला पकडण्यात यश आले. मळावाडी येथे एका खड्ड्यामध्ये सहा फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. लोकवस्तीजवळच मगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून या मगरीला शिताफीने जेरबंद केले. मगर पकडल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या मगरीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

  • 05 Mar 2026 04:30 PM (IST)

    05 Mar 2026 04:30 PM (IST)

    ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे पाण्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

    रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून रसायनी हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत आपटा कोरळवाडी आदिवासी वाडीत पिण्याचे ट्रीपल फिल्टर्ड शुद्ध पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी विनंतीनुसार उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बाराशे कोटीच्या योजनांचे कार्यारंभ आदेश देऊन सुमारे दोनशेहून अधिक आदिवासी वाड्या तहानलेल्याच असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या चौकशीवर आम्ही ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले आहे. दरम्यान कोरळवाडीसाठी मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना तीन वर्षे अपूर्ण राहिल्याने संतप्त झालेल्या आदिवासी भगिनींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २६ फेब्रुवारी २०२६ पासून रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बेबी दशरथ वाघे (वय ४६) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • 05 Mar 2026 04:25 PM (IST)

    05 Mar 2026 04:25 PM (IST)

    पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर!

    कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही तर ती आपल्या सुरक्षितेची हमी आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार कोपरगावच्या दौऱ्यावर असताना पोलिस स्टेशन व वसाहतीची हलाकीची परिस्थिती दाखवून जनतेची सेवा करणाऱ्या बांधवांना नवीन पोलिस स्टेशन आणि राहण्यासाठी नवीन वसाहत इमारतीची मागणी केली. त्यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आणि लगेच दोन्ही इमारतीसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कोपरगाव तालुका व ६४ कर्मचारी वसाहत इमारतीने कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकली, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

  • 05 Mar 2026 04:20 PM (IST)

    05 Mar 2026 04:20 PM (IST)

    ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे पाण्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

    रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून रसायनी हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत आपटा कोरळवाडी आदिवासी वाडीत पिण्याचे ट्रीपल फिल्टर्ड शुद्ध पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी विनंतीनुसार उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बाराशे कोटीच्या योजनांचे कार्यारंभ आदेश देऊन सुमारे दोनशेहून अधिक आदिवासी वाड्या तहानलेल्याच असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या चौकशीवर आम्ही ठाम असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले आहे. दरम्यान कोरळवाडीसाठी मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना तीन वर्षे अपूर्ण राहिल्याने संतप्त झालेल्या आदिवासी भगिनींनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २६ फेब्रुवारी २०२६ पासून रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बेबी दशरथ वाघे (वय ४६) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • 05 Mar 2026 04:15 PM (IST)

    05 Mar 2026 04:15 PM (IST)

    उरण तालुक्यात ‘शिवराज्य महसूल जनसंपर्क अभियान’

    “स्वराज्याचा ध्यास, लोककल्याणाचा संकल्प” या ब्रीदवाक्याने राज्यातील महसूल विभागामार्फत ‘शिवराज्य महसूल जनसंपर्क अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उरण तालुक्यात पुढील तीन महिन्यांत विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरांमधून नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांसारख्या सुमारे १५ महसूल सेवा थेट गावपातळीवरउपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे.तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी चाणजे, १४ एप्रिल रोजी जासई, १५ एप्रिल रोजी कोप्रोली, १७ एप्रिल रोजी केवळी आणि ८ मे रोजी उरण येथे ही शिबिरे होणार आहेत. उरण तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

  • 05 Mar 2026 04:10 PM (IST)

    05 Mar 2026 04:10 PM (IST)

    जामखेड गोळीबारातील जखमी मोहोळकराचा नवा व्हिडिओ आला समोर, प्रकरणाला नवे वळण

    काल सायंकाळच्या वेळी जामखेडमध्ये नुरानी कॉलनी या ठिकाणी सागर मोहळकर या व्यक्तीवर गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे. त्याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले असून सद्या प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते...दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनेची माहिती दिली असून घार्गे यांनी सांगितले की, मोटारसायकलवरती हे आरोपी आलेले होते आणि त्यांनी फायरिंग केलेलं आहे...त्या आरोपींचा शोध सुरू केला असून जे जखमी व्यक्ती हे जामखेड तालुक्यातलेच आहेत. गोळीबाराचे नेमकं अजून कारण लक्षात येत नाही परंतु ज्याच्यावरती फायरिंग झालेलं आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे पूर्वीचे पाच गुन्हे दाखल आहेत.

  • 05 Mar 2026 04:01 PM (IST)

    05 Mar 2026 04:01 PM (IST)

    युद्धाचा फटका व्यापारी शेतकऱ्याला

    इस्राएल व इराकच्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातील व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा बसला असून मार्च महिना हा सुद्धा उष्णतेचा असल्यामुळे त्याचाही फटका बसलेला आहे त्यामुळे शेतीच्या मालाचे मोठे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले शेतकऱ्यांनी आपला माल सध्या मार्केटला न आणता तो स्थानिक पातळीवरच विक्रीसाठी देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या नुकसान होणार नाही.

  • 05 Mar 2026 04:00 PM (IST)

    05 Mar 2026 04:00 PM (IST)

    Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

    रत्नागिरी: इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाची आवक बंद होणार आणि त्यामुळे इंधनटंचाई निर्माण होणार, अशी अफवा मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पसरली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर आणि परिसरातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपासह जिल्ह्यातील विविध पंपांवर पेट्रोल व डिझेल, सीएनजी गॅस भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इंधनपुरवठा खंडित झाल्यास अडचण निर्माण होईल, या भीतीनं अनेकांनी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या. रत्नागिरी शहरातील माळ नाका ते जयस्तंभपर्यंतच्या सर्वच पेट्रोल पंपांवर आणि हातखंबा येथील पेट्रोल पंपांवरही इंधन भरण्यासाठी दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या मोठ्या रांगा रात्री उशिरापर्यंत होत्या.

  • 05 Mar 2026 03:50 PM (IST)

    05 Mar 2026 03:50 PM (IST)

    Nepal Election 2026: नेपाळच्या राजकारणातील ‘घराणेशाही’ विरुद्ध जनक्षोभ

    Nepal General Election 2026 results : नेपाळमध्ये सध्या ‘जनरल झेड’ (Gen-Z) चळवळीच्या वादळानंतर नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत (Nepal Election 2026) केपी शर्मा ओली, गगन थापा आणि बालेन शाह यांसारख्या नेत्यांची जोरदार चर्चा असतानाच, एका ऐतिहासिक नावाचा दबदबा मात्र पूर्णपणे ओसरल्याचे चित्र दिसत आहे. ते नाव म्हणजे ‘कोइराला कुटुंब’. ज्या कुटुंबाने नेपाळला मातृका प्रसाद, विश्वेश्वर प्रसाद आणि गिरिजा प्रसाद कोइराला यांच्यासारखे तीन दिग्गज पंतप्रधान दिले, तेच कुटुंब आज आपल्या राजकीय अस्तित्वासाठी शेवटची लढाई लढत आहे.

  • 05 Mar 2026 03:40 PM (IST)

    05 Mar 2026 03:40 PM (IST)

    ‘सुट्टा रोल’ गाण्याने वाढवली Super Duper चित्रपटाची क्रेझ

    यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची धमाल मेजवानी घेऊन Super Duper हा भव्य कौटुंबिक चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर आता चित्रपटातील ‘सुट्टा रोल’ हा धमाकेदार पार्टी ट्रॅक रिलीज झाला असून, या गाण्याला तरुणांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि अभिनय जगताप यांचा दमदार आवाज लाभला आहे. गाण्याचे संगीतही अभिनय जगताप यांनीच दिले असून त्यामुळे ट्रॅक अधिक रंगतदार झाला आहे. तर गीतकार आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या शब्दांनी तरुणाईच्या भावना अचूकपणे व्यक्त केल्या आहेत.

  • 05 Mar 2026 03:30 PM (IST)

    05 Mar 2026 03:30 PM (IST)

    US Iran War : इराणची राख होणार? अमेरिकेने मैदानात उतरवले सर्वात घातक 'Gravity Bomb'

    US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : आता इराणची खैर नाही. कारण अमेरिकेने आता युद्धात आपले सर्वात घातक शस्त्रे उतरवले आहे. पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांतच इराणच्या हवाई क्षेत्रावर अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) नियंत्रण मिळवणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकेने आपले सर्वात घातक शस्त्रास्त्रांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तेहरानमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

     

  • 05 Mar 2026 03:20 PM (IST)

    05 Mar 2026 03:20 PM (IST)

    Women’s Day : खास महिलांसाठी होम क्रेडिट इंडियाचे संशोधन!

    महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होम क्रेडिट इंडियाच्या संशोधनातून भारतीय महिलांची आर्थिक क्षेत्रातील वाढती भूमिका अधोरेखित झाली आहे. कंपनीच्या हाऊ इंडिया बॉरोज स्टडी २०२५ (HIB 7.0) आणि द ग्रेट इंडियन वॉलेट 3.0 (GIW 3.0) या अहवालांनुसार, महिला डिजिटल व्यवहार, आर्थिक साक्षरता आणि जबाबदारीने कर्ज घेण्याच्या पद्धतींमध्ये आघाडी घेत भारतातील आर्थिक बदलाला नवे रूप देत आहेत.

  • 05 Mar 2026 03:10 PM (IST)

    05 Mar 2026 03:10 PM (IST)

    Mahabharat: द्रौपदीचे ३ महापाप कोणते?

    काही काळानंतर, पांडवांना वाटले की त्यांचा राजे म्हणून काळ संपला आहे. आता त्यांच्या राजवटीचा त्याग करून हिमालयातून स्वर्गात जाण्याची वेळ आली आहे. या प्रवासात द्रौपदी पाच पांडवांसह होती. तो हिमालयाच्या अर्ध्या उंचीवर चढला होता. सर्वांना वाटले होते की त्याने इतके चांगले काम केले आहे की तो त्याच्या शारीरिक स्वरूपात स्वर्गात पोहोचेल. पण तसे झाले नाही. कठीण चढाई सुरू होताच, द्रौपदी सर्वात आधी पडली आणि कधीही उठली नाही. तिचे निधन झाले. युधिष्ठिर वगळता, चार पांडव बंधू गोंधळले होते की हे का घडले. कारण द्रौपदीचे तीन घातक पाप होते, जे त्यांच्या मार्गात अडथळे बनले होते.

  • 05 Mar 2026 03:05 PM (IST)

    05 Mar 2026 03:05 PM (IST)

    मी परत आलोय…! Ratnagiri जिल्ह्यातील ‘या’ भागात बिबट्याचा हैदोस

    रत्नागिरी: तालुक्यातील सैतवडा परिसरात बिबट्‌याचा वावर आता ग्रामस्थांच्या जिवावर उठला असून, सोमवारी रात्री सैतवडे-बलभीमवाडी येथे बिबट्याने तिसरा हल्ला चढवला. या हल्ल्यात स्थानिक शेतकरी प्रदीप पवार यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले. एकामागून एक होणाऱ्या या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, वारंवार मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सैतवडा आसपासच्या वाड्यांमध्ये आणि बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत आहे.

  • 05 Mar 2026 02:55 PM (IST)

    05 Mar 2026 02:55 PM (IST)

    “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

    मुंबई : राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहे. उमेदवारी मिळण्यासाठी राजकीय नेत्यांनी (Political News) हालचाली सुरु केल्या आहेत. आज उमेदवारी जाहीर करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे.

  • 05 Mar 2026 02:50 PM (IST)

    05 Mar 2026 02:50 PM (IST)

    Israel Iran War चा मोठा फटका

    रत्नागिरी: इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाची आवक बंद होणार आणि त्यामुळे इंधनटंचाई निर्माण होणार, अशी अफवा मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात पसरली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर आणि परिसरातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपासह जिल्ह्यातील विविध पंपांवर पेट्रोल व डिझेल, सीएनजी गॅस भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इंधनपुरवठा खंडित झाल्यास अडचण निर्माण होईल, या भीतीनं अनेकांनी वाहनांच्या टाक्या पूर्ण भरून घेतल्या. रत्नागिरी शहरातील माळ नाका ते जयस्तंभपर्यंतच्या सर्वच पेट्रोल पंपांवर आणि हातखंबा येथील पेट्रोल पंपांवरही इंधन भरण्यासाठी दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या मोठ्या रांगा रात्री उशिरापर्यंत होत्या.

  • 05 Mar 2026 02:45 PM (IST)

    05 Mar 2026 02:45 PM (IST)

    कतारमधील अल-उदेद तळ हादरला!

    मध्यपूर्वेतील युद्ध (Israel Iran war) आता एका अशा वळणावर पोहोचले आहे, जिथे केवळ दोन देश नाही तर संपूर्ण जगाची सुरक्षा व्यवस्था पणाला लागली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने जगभरातील १६० देशांमध्ये आपले १,०८,००० पेक्षा जास्त सैन्य तैनात केल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे. मात्र, दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या सर्वात प्रगत अशा हवाई संरक्षण यंत्रणेला खिंडार पाडल्याचा दावा करून अमेरिकन लष्करी सामर्थ्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

  • 05 Mar 2026 02:40 PM (IST)

    05 Mar 2026 02:40 PM (IST)

    2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा

    Post Office Scheme News in Marathi : प्रत्येकजण उत्पन्नाचा काही भाग वाचवतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याची योजना आखतो जिथे त्यांचे पैसे सुरक्षित असतील आणि चांगले परतावा मिळतो. या संदर्भात, पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या सरकारी योजना खूप लोकप्रिय आहेत. जिथे सरकार स्वतः गुंतवलेल्या निधीच्या सुरक्षिततेची हमी देते. अशीच एक लोकप्रिय योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, एफडी सारखीच, ज्यामध्ये फक्त २ लाखांच्या गुंतवणुकीतून ९०,००० मिळू शकतात आणि तेही केवळ व्याजातून मिळते, नेमकी ही योजना काय आहे? जाणून घ्या.. .

  • 05 Mar 2026 02:30 PM (IST)

    05 Mar 2026 02:30 PM (IST)

    सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’

    १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अक्षय कुमार आणि प्रियदर्शन एकत्र येत आहेत. त्यांचा पुढचा चित्रपट “भूत बांगला” आहे, जो १० एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या बातमीने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. हे दोघे हिंदी चित्रपटसृष्टीला काही सर्वात प्रिय विनोदी चित्रपट देण्यासाठी ओळखले जातात. यावेळी, ते एका हॉरर-कॉमेडीसह परतत आहेत. अलीकडेच, “भूत बांगला” चित्रपटाच्या सेटचे रूपांतर एका मिनी क्रिकेट मैदानात करण्यात आले कारण अक्षय कुमारने कॅमेऱ्यामागेही आपली ऊर्जा दाखवलेली दिसत आहे. बालाजी मोशन पिक्चर्सने भारताच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जिथे सुपरस्टार शिखर धवनसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

  • 05 Mar 2026 02:25 PM (IST)

    05 Mar 2026 02:25 PM (IST)

    अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार

    क्रिकेट देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, त्याची दीर्घकालीन मैत्रीण सानिया चांडोक हिच्याशी मुंबईत एका भव्य विवाह सोहळ्यात विवाहबंधनात अडकला. मागील अनेक दिवसांपासून अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह सोहळ्याआधीच कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत होते. आज अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा वरमाला समारंभ पार पडला आणि दोघांनी लग्न सोहळा झाल्यानंतर एकमेकांना घट्ट मिठी मारली. या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

  • 05 Mar 2026 02:20 PM (IST)

    05 Mar 2026 02:20 PM (IST)

    ”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी

    बिग बॉसच्या घरात राखी सावंतने वाइल्ड कार्ड एन्ट्री केल्यापासून घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राकेश आणि तन्वीचा डान्स पाहून राखीने स्वत:ला त्रास करून घेतला. तिने चक्क तिचे केस कापून घेतले. राकेश आणि राखीची निव्वळ मैत्री आहे, पण सध्या सगळेजण त्यांना मज्जा म्हणून चिडवताना दिसत आहेत. कालच रूचिताची विशालवरून समजूत काढताना स्वत:बिग बॉसने रूचिताला राखी आणि राकेशच्या नात्याचं उदाहरण दिलं होते.मात्र, राखीच्या बाजने ही केवळ मैत्री आहे का. हे आजच्या भागात कळणार आहे.

  • 05 Mar 2026 02:15 PM (IST)

    05 Mar 2026 02:15 PM (IST)

    ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष

    कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील नेरळ गुडवण रस्त्याच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत. या कामांची पाहणी करायला एम एम आर डी ए चे अभियंते येत नाहीत आणि त्यामुळे ठेकेदाराकडून मर्जीनुसार कामे सुरू आहेत.एम एम आर डी ए कडून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला करोडोंचे कामे दिली असल्याने ठेकेदाराला मालामाल करण्यासाठी अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

  • 05 Mar 2026 02:10 PM (IST)

    05 Mar 2026 02:10 PM (IST)

    बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ

    बंगळुरू: बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून आणि कौटुंबिक वादाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पी. सुषमा असे आहे. ती सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी सुषमाचे पती पुनीत कुमार याला अटक केल्याची माहिती आहे.

  • 05 Mar 2026 02:05 PM (IST)

    05 Mar 2026 02:05 PM (IST)

    ‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा

    “नागबंधन” हा आगामी चित्रपट संपूर्ण भारतात चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालत आहे. अभिषेक नामा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती किशोर अन्नापुरेड्डी आणि निशिता नागिरेड्डी यांनी एनआयके स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत नवीन बेंचमार्क स्थापित करेल आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे. “नागबंधन” मधील “नमो रे” हे गाणं प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. हे गाणं येत्या १५ मार्च रोजी सकाळी ११:११ वाजता प्रदर्शित होणार आहे. हे खास गाणे भगवान नारायणांना समर्पित केले आहे आणि चित्रपटाच्या खोल आध्यात्मिक विषयांना प्रतिबिंबित करते आहे.

  • 05 Mar 2026 01:55 PM (IST)

    05 Mar 2026 01:55 PM (IST)

    ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’

    मध्यपूर्वेतील (Middle East Crisis) रणसंग्राम शिगेला पोहोचला असतानाच, अमेरिकन लष्करी मुख्यालयाने (पेंटागॉन-Pentagon) आपल्या जागतिक लष्करी ताकदीचा सर्वात मोठा आकडा जाहीर केला आहे. अमेरिकन सैन्याचे उपप्रमुख जनरल क्रिस्टोफर लानेव्ह यांनी सिनेट समोर दिलेल्या साक्षीत खळबळजनक खुलासा केला की, सध्या जगातील तब्बल १६० देशांमध्ये १,०८,००० हून अधिक अमेरिकन सैनिक तैनात आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या थेट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने केवळ मध्यपूर्वेच नव्हे, तर संपूर्ण जगाला ‘लष्करी वेढा’ घातल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

  • 05 Mar 2026 01:40 PM (IST)

    05 Mar 2026 01:40 PM (IST)

    परदेशी महिलेच्या त्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ, नेमकं काय प्रकरण?

    सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियामुळे आपण संपूर्ण जगाशी क्षणात जोडलो जाऊ शकतो. सध्या भारतात होळीचा उत्सव सुरु असून याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच व्हिडिओंमध्ये एका परदेशी महिलेने एक भारतातील होळी खेळण्याबाबत मोठे भाष्य केले आहे. ज्यामुळे इंटरनेटवर वाद पेटाला आहे.

  • 05 Mar 2026 01:35 PM (IST)

    05 Mar 2026 01:35 PM (IST)

    नांदेडमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची अमानुष मारहाण

    नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातलगातील विवाहित महिलेसोबत संबंध ठेवल्याचा रागातून २२ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ३ मार्च रोजी पहाटे मौजे थडीसावळी येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव दुर्गेश सिंह ठाकूर (रा. मुतण्याळ, ता. बिलोली) असे आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रीशियन होता. दुर्गेश याचे थडीसावळी येथील नातलगातील एका विवाहित महिलेसोबत संबंध असल्याचा संशय होता. ही बाब महिलेच्या कुटुंबियांना समजताच संतापलेल्या नातेवाईकांनी ३ मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास दुर्गेशसिंहच्या घरी जाऊन त्याला जबरदस्तीने उचलून थडीसावळी येथे आणले.

  • 05 Mar 2026 01:25 PM (IST)

    05 Mar 2026 01:25 PM (IST)

    राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा

    बिग बॉसच्या घरात राखी सावंतने वाइल्ड कार्ड एन्ट्री केल्यापासून घरात रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राकेश आणि तन्वीचा डान्स पाहून राखीने स्वत:ला त्रास करून घेतला. तिने चक्क तिचे केस कापून घेतले.राकेश आणि राखीची निव्वळ मैत्री आहे, पण सध्या सगळेजण त्यांना मज्जा म्हणून चिडवताना दिसत आहेत. कालच रूचिताची विशालवरून समजूत काढताना स्वत:बिग बॉसने रूचिताला राखी आणि राकेशच्या नात्याचं उदाहरण दिलं होते.मात्र, राखीच्या बाजने ही केवळ मैत्री आहे का. हे आजच्या भागात कळणार आहे.

  • 05 Mar 2026 01:17 PM (IST)

    05 Mar 2026 01:17 PM (IST)

    इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत

    वानखेडेच्या मैदानावर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये टी20 विश्वचषक 2026 चा सेमीफायनलचा महामुकाबला आज रंगणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना काल कोलकताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडने पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा संघ आज इंग्लंडविरूद्ध मालिका खेळणार आहे, इंग्लंडने फक्त लीग सामन्यामध्ये एक सामना गमावला होता त्यानंतर सुपर 8 मध्ये संघाने एकही सामना गमावला नाही.

  • 05 Mar 2026 01:10 PM (IST)

    05 Mar 2026 01:10 PM (IST)

    पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज

    पुणे शहरापासून अत्यंत जवळचा तालुका म्हणून पुरंदरची ओळख आहे. सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून बघितले जात आहे. मात्र, सध्या तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना संघटीतपणे मारहाण केली जात आहे. दुचाकीस्वार सायलेन्सरच्या पुंगळ्याचे मोठाले आवाज करून मोकाट फिरत आहेत. चोरीच्या मोठमोठ्या घटनांचा तपास केवळ कागदावर दिसत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी, केबल चोरून नेल्या जात आहेत. एकूणच गुन्हेगार मोकाट सुटल्याचे दिसत असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 05 Mar 2026 01:08 PM (IST)

    05 Mar 2026 01:08 PM (IST)

    बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

    बिहारच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. काहीच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नीतीश कुमार आणि भाजपच्या युतीला घवघवीत यश मिळाले. यानंतर नीतीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर आता नीतीश कुमार (Nitish Kumar) यांना दिल्लीचे वेध लागले असल्याचे दिसून आले आहे. नीतीश कुमार हे लवकरच राज्यसभा खासदार होणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये (Bihar Politics) चर्चांना उधाण आले आहे. नीतीश कुमार यांच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्रिपद कोण सांभाळणार याची चर्चा सुरु झाली आहे.

  • 05 Mar 2026 01:05 PM (IST)

    05 Mar 2026 01:05 PM (IST)

    चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

    शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी (पाचंगेवस्ती) येथील एका क्लिनिकमध्ये मोबाईल ॲपच्या माध्यमातून गर्भलिंग निदान केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. आरोग्य विभागाच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पथकाने याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी डॉक्टरसह एजंटला अटक केली असून, त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • 05 Mar 2026 01:00 PM (IST)

    05 Mar 2026 01:00 PM (IST)

    शिक्रापुरात तलावात पोहायला गेलेल्या तीन मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू तर एक बचावली

    पिंपळे जगताप (ता.शिरुर) येथील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गेलेल्या तिघी मुली पाण्यात बुडाल्या. मात्र, या दुर्घटनेत दोन मुलींचा मृत्यू होऊन एक मुलगी सुदैवाने बचावल्याची घटना घडली असून, साक्षी गोरख मुरकुटे व पायल भरत पवार असे दोघी मृत मुलींचे तर दिव्या गोरख मूरकुटे असे सुदैवाने बचावलेल्या मुलीचे नाव आहे.

  • 05 Mar 2026 12:50 PM (IST)

    05 Mar 2026 12:50 PM (IST)

    10 की 11 मार्च नेमकी कधी आहे शीतला सप्तमी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

    धार्मिक श्रद्धेनुसार,  शीतला सप्तमीचा उत्सव शीतला देवी यांना समर्पित आहे. ज्याची पूजा रोगांपासून संरक्षण करणारी आणि पवित्रता प्रदान करणारी देवी म्हणून केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी देवी शीतलाची पूजा केल्याने चेचक आणि त्वचारोगांसारख्या आजारांपासून संरक्षण होते. यामुळे कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. हे व्रत प्रामुख्याने महिला पाळतात. काही ठिकाणी हा सण आठव्या दिवशी साजरा केला जातो.

  • 05 Mar 2026 12:40 PM (IST)

    05 Mar 2026 12:40 PM (IST)

    इंग्लंडविरुद्ध भारताचा T20 मध्ये काय रेकॉर्ड आहे? उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नजर टाका आकडेवारी

    भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये t20 विश्वचषक 2026 चा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. भारताच्या संघासाठी मुंबईचे मैदान लकी ठरणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भारताचे संघाने आतापर्यंत स्पर्धेमध्ये फक्त एक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला होता त्या व्यतिरिक्त भारताचे संघाने आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्माने आतापर्यंत निरशाजनक कामगिरी केली आहे. मागील सामन्यामध्ये संजू सॅमसंगची मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली.

  • 05 Mar 2026 12:35 PM (IST)

    05 Mar 2026 12:35 PM (IST)

    नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार? बिहारच्या राजकारणात काय आहे गेम चेंजर प्लॅन!

    बिहाराच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत जाणार आहेत. त्यांनी एका ट्विटमध्ये याची पुष्टी केली. आता, नवीन मुख्यमंत्र्यांसाठी सज्ज व्हा. जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली, ज्यामुळे बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले त्यांचे कार्यकाळ संपले. जेडीयूने नितीश कुमार आणि रामनाथ ठाकूर यांच्यासाठी राज्यसभेच्या दोन्ही जागांसाठी एनआर (नजरत पावती) देखील दाखल केली आहे. दुपारी १ ते २ दरम्यान नामांकने दाखल होण्याची शक्यता आहे.

  • 05 Mar 2026 12:30 PM (IST)

    05 Mar 2026 12:30 PM (IST)

    “मुलीला पुन्हा त्रास दिला तर…”; लेकीची छेड काढणाऱ्या तरुणाला बापाने घडवली अद्दल; कॅप्मसमध्येच दिला चोप

    मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलीच्या वडीलांनी जोरदार चोप दिला. पुण्यातील नामांकित विद्यापीठाच्या आवारामध्ये हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला आहे. एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि बेदम चोप दिला. छेड काढल्यामुळे संतप्त झालेल्या पित्याने जोरदार खडेबोल सुनावले.

  • 05 Mar 2026 12:25 PM (IST)

    05 Mar 2026 12:25 PM (IST)

    मध्यप्रदेश हादरला! अनैतिक संबंधांच्या संशयातून 18 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या; मृतदेह १० दिवस घरातच ठेवला आणि…

    मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने १८ महिन्यांच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिची हाती करून मृतदेह १० दिवस घरातच लपवून ठेवला. ही चिमुकली आरोपी महिलेच्या पतीच्या प्रेयसीची मुलगी आहे. ही घटना मध्यप्रदेश येथील सिंगरौली जिल्ह्यात घडली.

  • 05 Mar 2026 12:20 PM (IST)

    05 Mar 2026 12:20 PM (IST)

    इंग्लंडविरुद्ध भारताचा T20 मध्ये काय रेकॉर्ड आहे? उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नजर टाका आकडेवारी

    भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये t20 विश्वचषक 2026 चा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. भारताच्या संघासाठी मुंबईचे मैदान लकी ठरणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भारताचे संघाने आतापर्यंत स्पर्धेमध्ये फक्त एक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला होता त्या व्यतिरिक्त भारताचे संघाने आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्माने आतापर्यंत निरशाजनक कामगिरी केली आहे. मागील सामन्यामध्ये संजू सॅमसंगची मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली.

  • 05 Mar 2026 12:15 PM (IST)

    05 Mar 2026 12:15 PM (IST)

    इराणचा बदला अन् पाकिस्तानी मोहरा! हॉटेलच्या खोलीत ‘असा’ ठरला ट्रम्पच्या हत्येचा मास्टरप्लॅन; बनले युद्धाचे कारण

    जागतिक राजकारणात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी अमेरिकेच्या फेडरल कोर्टातून समोर आली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump), माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली (Nikki Haley) यांच्या हत्येचा कट एका पाकिस्तानी नागरिकाने रचला होता. बुधवारी ब्रुकलिनच्या कोर्टात उभे राहिलेले आसिफ मर्चंट (Asif Merchant) यांनी दिलेली साक्ष पाहून न्यायाधीशांपासून ते ज्युरीपर्यंत सर्वच हादरून गेले आहेत. इराणच्या सांगण्यावरून हा कट आखला गेल्याचे मर्चंटने मान्य केले असले तरी, त्यामागे एक धक्कादायक कौटुंबिक कहाणी त्याने सांगितली आहे.

Web Title: Maharashtra breaking news 5th march live updates maharashtra politics war world war3 us israel iran war cricket sports crime share market live entertainment national international

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • National Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  बारामतीत पुन्हा विमान अपघात
1

Maharashtra Breaking News Updates Today:  बारामतीत पुन्हा विमान अपघात

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
2

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा
3

Ahilyanagar : शेकडो वारकऱ्यांचे ‘टाळ-मृदुंग’ आंदोलन; लवांडेंना अटकेचा इशारा

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Devendra Fadnavis News: राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.