
MLA Rohit Pawar aggressive over manikrao kokate Membership of the Legislative Assembly cancelled
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सदनिका लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे देऊन लाटल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणामध्ये कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी जाण्याची सर्वात जास्त शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा : Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द
या प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पद रद्द करण्याची मागणी केली. रोहित पवारांनी लिहिले आहे की, माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले
तसेच आमदार रोहित पवार यांनी लिहिले आहे की, गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा…! अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025