मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून दिलासा देण्यात आला आहे. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल. असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नाही.
Nawab Malik : मुंबईमध्ये अजित पवारांचा भाजपला दे धक्का? नाराजीनंतरही नबाव मलिकांकडे दिले नेतृत्व
माणिकराव कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. पण आमदारकी रद्द करण्यासाठी विधीमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत आवश्यक असते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निकालाची प्रत मिळाल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असल्याची माहिती विधीमंडळातील सुत्रांकडून मिळाली आहे. (Ajit Pawar NCP)
राज्यातील राजकारणात सुरू असलेल्य सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊंटवरून टिकास्त्र डागले आहे.
“माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा…! ” असं रोहित पवार यांनी विचारलं आहे.
माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025






