MLA Rohit Pawar on malegaon blast case Court verdict
मुंबई : महाराष्ट्रातील मालेगावमध्ये रमजानच्या आदल्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. मालेगाव येथील भिक्कू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला. हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर दबाव असल्याचे देखील म्हटले जात आहे. या प्रकरणाचा निकाल हाती आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत आतंकवादी हा भगवा नसल्याचे म्हटले होते. यावर आता रोहित पवार यांनी पोस्ट लिहिली आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon bomb blast) प्रकरणावरुन आतंकवाद हा भगवा नसल्याचे म्हणत प्रतिक्रिया देत असल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा, स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी नथुराम गोडसे असो वा पहलगाम हल्ल्यातले आतंकवादी असो हे सगळे आतंकवाद्यांचे मूळ अतिकडव्या विचारात आहे. आतंकवादाला कोणताही रंग नसतो तर केवळ अती कडवा विचार हाच आतंकवादाचा आधार असतो, हे आतंकवादाला राजकीय रंग देऊ पाहणाऱ्या राजकीय नाटकी पेंटर्सनी लक्षात घ्यायला हवे”
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“हिंदू धर्माची परंपरा नेहमीच समतेच्या, मानवतेच्या आणि संतांच्या विचाराला पुरस्कृत करत आली आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत परंपरेच्या मानवतावादी समाजाला पुढे नेऊन विचारांना विरोध करणाऱ्या मनुस्मृतीवर आधारलेली मनुवादी विचारांची परंपरा हिंदू धर्माचा भाग होऊच शकत नाही. धर्माची शिकवण समाजाला पुढे नेणारी असते, मागे खेचणारी असूच शकत नाही. आम्ही मनुस्मृती कालही जाळली आजही जाळत आहोत आणि उद्या देखील जाळू.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आज देशात सर्वत्र शेतकरी अडचणीत आहे, महिला सुरक्षेचा, बेरोजगारिचा विषय ज्वलंत आहे, या समस्याचा सामना सर्व धर्मियांप्रमाणे हिंदूंना देखील आहेच ना? हिंदू धर्मीय या अडचणीचा सामना करत असताना यासाठी आवाज उठवण्याचा विचार तथाकथित हिंदुत्ववादी नेते का करत नाहीत? हिंदू धर्मीय शेतकरी करत असलेल्या आत्महत्या यांना दिसत नाही का? नोकरीसाठी वणवण फिरणारा हिंदू युवा यांना दिसत नाही का? अति कडवे विचार मांडणारे बेगडी प्रेम दाखवणारे नेते मग ते कोणत्याही धर्माचे असोत ते केवळ राजकीय पोळ्या शेकतात हेच खरं वास्तव आहे,” असे लिहित रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा, स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी नथुराम गोडसे असो वा पहलगाम हल्ल्यातले आतंकवादी असो हे सगळे आतंकवाद्यांचे मूळ अतिकडव्या विचारात आहे.
आतंकवादाला कोणताही रंग नसतो तर केवळ अती कडवा विचार हाच आतंकवादाचा आधार असतो, हे आतंकवादाला राजकीय रंग…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2025