जनतेचे पंचवीस टक्के देखील समर्थन नसलेल्या पक्षाचे शिंदे प्रदेशाध्यक्षच; भाजपच्या 'या' नेत्याची जहरी टीका (File Photo : Shashikant Shinde)
Follow Us:
Follow Us:
सातारा : जावळी तालुक्यातील कोलेवाडी (हुमगाव) या छोट्याशा गावातून मुंबई नगरीत उद्योग व्यवसायात उभारी घेतलेले दत्ताशेठ भालेघरे (पवार) यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. एका उदयोन्मुख उद्योजकाच्या पायात खोडा घालण्याचे काम तालुक्यातील काही अपप्रवृत्ती करत आहेत. अशा अपप्रवृत्तींचा आम्ही जावळीकर निषेधच करतो. मात्र, 25 टक्के देखील समर्थन नसलेल्या पक्षाचे शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, अशी जहरी टीका भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांनी केली.
दत्ताशेठ भालेघरे यांच्या चौकशीची विधानपरिषदेत मागणी केल्यामुळे तालुक्यातील युवकांमध्ये, नागरिकांमध्ये अशा अपप्रवृत्तींबद्दल संतप्त भावना होत्या. या भावनांचा विचार करून सोमवारी (दि.4) पाचवड ते मेढा निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही निषेध रॅली तालुक्यातील उद्योजक भालेघरे यांना ज्या अपप्रवृत्ती रोखत आहेत, अशा अपप्रवृत्तीच्या विरोधात होती. तालुक्यात नव्याने उभे राहणाऱ्या उद्योन्मुख उद्योजकांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात येणार होती. मात्र, जावळीतील जनतेमध्ये ताणतणाव वाढू नये ही सूचना आमचे नेते व बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्यामुळे त्यांचा आदेश प्रणाम मानून सोमवारी होणारा मोर्चा, रॅली स्थगित करत आहोत.
दरम्यान, मानकुमरे यांनी पुढे म्हटले की, सातारा-जावळी तालुक्याचे आमचे नेते शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या मध्यामातून तालुक्यात अनेक विकासकामे होत आहेत. बोंडारवाडी धरण, महू हातगेघरची अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे.
मी व माझे सहकारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून बोंडारवाडी व महू हातगेघर धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात खळखळावे म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला दिला, तालुक्यात ताणतणाव होऊ नये यासाठी हा मोर्चा, रॅली स्थगित करण्याच्या त्यांनी आम्हाला सूचना केल्या आहेत. त्यामुळे हा मोर्चा निषेध रॅली स्थगित करत आहोत, असे मानकुमरे यांनी कळवले आहे.
Web Title: Bjp leader vasantrao mankumare criticized on shashikant shinde over many issue