Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना शिवसेनेत मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होणार?

पक्षात शिस्त व गटबाजीला आळा घालण्यासाठी आमदार सुहास कांदे यांना पक्षाने बळ दिले आहे. कांदे हे भुजबळांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या पक्ष संघटनेतील समावेशामुळे सामान्य शिवसैनिकांना बळ मिळण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2025 | 01:26 PM
भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना शिवसेनेत मिळाली 'ही' मोठी जबाबदारी; महापालिका निवडणुकीत फायदा होणार?

भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना शिवसेनेत मिळाली 'ही' मोठी जबाबदारी; महापालिका निवडणुकीत फायदा होणार?

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच सत्तेवर असलेल्या शिवसेनेत स्थानिक व जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला बेबनाव व पदाधिकाऱ्यांची गटबाजी दिसून आली. ही परिस्थिती लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष शिस्त तसेच संघटन बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांची जिल्हा संघटकपदी नेमणूक केली आहे.

सुहास कांदे यांच्या नेमणूकीमुळे पक्षांतर्गत गटबाजीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे निष्ठावंतांचे म्हणणे आहे. सध्या जिल्ह्याची जबाबदारी सचिव भाऊसाहेब चौधरी, राम रेपाळे, उपनेते व जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, जिल्हा संपर्कपदी विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुखपदी राजू लवटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यातील प्रत्येक नेत्याचे विविध गट कार्यरत असून, त्यातून संघटनेतील बेबनाव वेळोवेळी समोर आला आहे. एवढेच नव्हे तर पक्षप्रमुखांकडे एकमेकांच्या तक्रारीही करण्यात आल्याने गटबाजी जाहीरपणे उघड झाली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेकडे पदाधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष झाल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करू लागले होते.

हेदेखील वाचा : ‘प्रत्येकाला धर्माचा…’ हिंदू संघटनांवर कडाडले AIMIM नेता वारीस पठाण, महाराष्ट्रातील नमाज वादावर भडकले, राजकारण तापणार?

अशातच स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेची निवडणुकीचे वातावरण तापण्यास मदत झाली आहे. परंतु पक्ष पातळीवर बैठका घेण्यापुरतेच संघटनेचे काम सीमित झाले आहे. अशात पक्षात शिस्त व गटबाजीला आळा घालण्यासाठी आमदार सुहास कांदे यांना पक्षाने बळ दिले आहे. कांदे हे भुजबळांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या पक्ष संघटनेतील समावेशामुळे सामान्य शिवसैनिकांना बळ मिळण्याची शक्यता गृहीत धरून कांदे यांची जिल्हा संघटकपदी नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

Web Title: Mla suhas kande appointed as shivsena district organizer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MLA Suhas Kande
  • political news

संबंधित बातम्या

Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ
1

Panvel News: स्वीकृत नगरसेवकपदावर ‘आर्थिक सौदा’चा संशय? पनवेलमध्ये शिवसेना उबाठा गटात खळबळ

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया
2

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?
3

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Nitish Kumar son: नितीश कुमार यांचा मुलगा निशांतची राजकारणात एन्ट्री; JDUमध्ये मोठी खांदेपालट होणार?
4

Nitish Kumar son: नितीश कुमार यांचा मुलगा निशांतची राजकारणात एन्ट्री; JDUमध्ये मोठी खांदेपालट होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.